‘भाईजान’ सलमाननं सुरू केली शेती, फोटो शेअर करत म्हणाला – ‘जय जवान जय किसान’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सलमान खानचा एक फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. हा फोटो सलमाननंच सोशलवर शेअर केला होता. सध्या या फोटोची खूप चर्चा होत आहे. सलमान खान शेतात उभा आहे. सलमान गेल्या 3 महिन्यांपासून त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर आहे. इथून त्यानं काही गाणीही शुट केली आहेत.

सलमाननं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. फोटोत तो शेतात उभा राहून स्माईल करताना दिसत आहे. आपल्या फार्म हाऊसवरील कामात सलमान खान सतत व्यस्त दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर त्यानं ग्रे कलरचा टी शर्ट आणि शॉर्ट घातली आहे. डोक्यावर कॅपही घातली आहे. शेतात काम करत त्यानं पोजही दिली आहे.

फोटो शेअर करताना सलमान म्हणतो, “दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. जय जवान जय किसान.” सध्या सलमानचा हा फोटो झपाट्यानं व्हायरल होत आहे.

सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच तो राधे इंडियाज मोस्ट वॉन्टेड या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत दिशा पाटनी दिसणार आहे. प्रभू देवा हा सिनेमा डायरेक्ट करत आहे. या सिनेमात सलमानची वेगळी भूमिका पहायला मिळणार आहे. ईदच्या निमित्तानं 22 मे 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार होता. परंतु कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं ते शक्य झालं नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like