home page top 1

सलमान, शाहरुख आणि आमिरला ‘खिलाडी’ अक्षयने टाकले पिछाडीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन-बॉलिवूडमधील तीन सर्वात दिग्गज अभिनेते सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान यांना मानलं जातं. परंतु बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मात्र या तीनही खानला मागे टाकले आहे. 2018 मध्ये भारतीय कलाकारांनी अनेक जाहिराती केल्या आहेत. आपली एंडॉर्समेंट व्हॅल्यूही त्यांनी वाढवली आहे. या यादीत खिलाडी सुपरस्टार अक्षय कुमार पहिल्या क्रमांकावर आहे.

रिपोर्ट्सनुसार, 2018 मध्ये एंडॉर्समेंट व्हॅल्यू मध्ये 2 वर्षात सर्वात जास्त नफा दिसून आला आहे. जिथे अक्षय कुमार सर्वांना भारी भरताना दिसून आला आहे. याआधी या यादीत अमिताभ बच्चन सोबत तीनही खानचा समावेश होता. परंतु आता अक्षयने बाजी मारली आहे. समोर आलेल्या आकड्यांनुसार, 2016 मध्ये कूल सेलिब्रिटींची ब्रँड व्हॅल्यून 605 करोड इतकी होती. आता 2017 त्यात वाढ होऊन ती 795 करोड इतकी झाली आहे.

शिवाय हा आकडा 2018 मध्ये 995 करोड पर्यंत येऊन पोचला आहे. खिलाडी अक्षय कुमार बद्दल बोलायचे झाले तर, त्याची एंडॉर्समेंट वर्थ 100 करोड असून टॉपवर आहे. यानंतर रणवीर सिंग(84 करोड), दिपिका पादुकोण(75 करोड), अमिताभ बच्चन(72 करोड), आलिया भट्ट(68 करोड) या नावांचा समावेश आहे.तीनही खान पाहिले तर ते टॉप 5 पासूनही दूर आहेत.

या यादीत सहा नंबरला शाहरुख खान(56 करोड), नंतर वरुण धवन(48 करोड), सलमान खान(40 करोड), करीना कपूर(32 करोड), आणि कॅटरीना कैफ(30 करोड) अशा नावांचा समावेश आहे.

Loading...
You might also like