‘सपा’चा भाजपा खासदारावर गंभीर आरोप, म्हणाले – ‘7 लाख देऊन थायलँडवरून कॉलगर्लला बोलावलं, पुढं…’

लखनौ : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येबरोबरच मृत्यूची संख्या वाढत असल्याचे चिंता वाढली आहे. अशातच उत्तर प्रदेशामध्ये एका थायलँडवरुन आलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दहा दिवसांपूर्वी मृत तरुणीला एका व्यावसायिकाने 7 लाख रुपये देऊन मौजमजा करण्यासाठी बोलावलं होतं. यानंतर आता समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी भाजप राज्यसभा खासदार संजय सेठच्या मुलाने या तरुणीला बोलावल्याचा आरोप केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास लखनौ पोलीस करत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण ?

काही दिवसांपूर्वी लखनौ येथील एका व्यापाऱ्याने थायलँडमधील कॉलगर्ल तरुणीला 7 लाख रुपये खर्च करुन बोलावले होते, असे वृत्त समोर आले होते. 10 दिवसांपूर्वी ही कॉलगर्ल तरुणी लखनौ येथे आली होती. त्यानंतर दोन दिवसांत ती कोरोना संक्रमित झाल्याने आजारी पडली. याची माहिती व्यावसायिकाने थायलँड एम्बेसीला दिली. त्यानंतर एम्बेसीच्या हस्तक्षेपानंतर कॉलगर्ल तरुणीला राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना या तरुणीचा 3 मे रोजी मृत्यू झाला.

राजधानीमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट

थायलँड येथील कॉलगर्ल तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी सरु केली आहे. या प्रकरणामुळे युपीच्या राजधानीमध्ये आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट पसरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही तरुणी भारतात आल्यानंतर ती कोणाकोणाच्या संपर्कात आली होती. याचा शोध पोलीस घेत आहेत.

पोलिसांमध्ये चौकशी करण्याची हिंमत आहे का ?

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर सपाचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी गंभीर आरोप केला आहे की, थायलँडवरुन कॉलगर्ल बोलवणारा दुसरा तिसरा कोणी नसून भाजपचे राज्यसभा खासदार संजय सेठ यांचा मुलगा आहे. तसेच आयपी सिंह यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा फोटो शेअर करत म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला उभे असणाऱ्या भाजप खासदार संजय सेठवर गंभीर आरोप आहे. जगभरात महामारी सुरू असताना थायलंडवरून कॉलगर्ल बोलावली आता तिचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये हिंमत आहे का याची चौकशी करण्याची ? असे आव्हान त्यांनी युपी पोलिसांना दिले आहे.

आयपी सिंग यांनी उपस्थित केले प्रश्न

लखनौ पोलीस या प्रकरणावर अधिकृत भाष्य का करत नाही ? कॉलगर्लच्या मृतदेहाचं पोस्टमोर्टम कुठे आहे ? शिवम कुक कोण आहे. ज्याला मृतदेह हाताळायला सांगितलं, त्याच्या जीवालाही धोका आहे. राकेश शर्मा स्थानिक हँडलर कुठे गायब झाला आहे ? एजंट सलमानही बेपत्ता आहे, असा गंभीर आरोप करत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.