पोलीसनामा ऑनलाइन टीम – Samantha-Naga Chaitanya Angry Photo | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) वैयक्तिक कारणांमुळे एकमेकांपासून विभक्त झाले. मात्र त्यांचा या निर्णयामुळं अनेक चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. तसेच अद्याप काही नेटकरी त्यांचा घटस्फोटामुळं प्रश्नचिन्हात आहे. मात्र नुकतंच सोशल मीडियवरील समंथाच्या एका पोस्टनं धुमाकूळ घातला आहे. (Samantha-Naga Chaitanya Angry Photo)
समंथाने सोशल मीडियावरील इंन्टाग्रामच्या अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये तिनं एक्स पती नागा चैतन्याचा (Naga Chaitanya) फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या स्टोरीतील फोटोमध्ये नागा चैतन्याचा लूक रागात आहे. मात्र आज त्या दोघांनी एकत्र काम केलाला चित्रपट ‘मजिली (Majili)’ ला 3वर्ष पूर्ण झालं असल्यान, तिनं नागा चैतन्यचा या रागामधील असलेला पोस्टर शेअर केलं आहे. (Samantha-Naga Chaitanya Angry Photo)
मात्र, विभक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच समंथानं नागा चैतन्याबद्दल (Samantha – Naga Chaitanya Divorce) काही शेअर केलं आहे. त्यामुळं चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. तर अनेक चाहत्यांना ते पुन्हा एकत्र येणार कि काय? याबद्दलचे अनेक प्रश्न पडले आहे (Samantha – Naga Chaitanya Breaking News)
दरम्यान, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये नागा चैतन्य आणि समंथा या दोघांंनी इंन्टाग्रामवर स्टोरी (Samantha – Naga Chaitanya Divorce News) शेअर केली होती. त्यामध्ये त्यांनी लिहिलं होत की, ‘आमच्या सगळ्या हितचिंतकांसाठी, खूप विचार केल्यानंतर आम्ही आमच्या मार्गावर पूढे जाण्यासाठी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एक दशकाहून अधिक काळ असलेली मैत्री आमच्या नात्यासाठी अधिक मोल्यवान आहे.
तसेच आम्ही खूप भाग्यशाली आहोत. आमच्या मध्ये नेहमीच एक विशेष बंधन असेल,
असा आम्हाला विश्वास आहे.
आम्ही आमच्या सगळ्या चाहत्यांना, हितचिंतकांना आणि माध्यामांना विनंती करतो की,
कठीण काळामध्ये आम्हाला पाठिंबा द्या, तसेच आम्हाला पूढे जाण्यासाठी आवश्यक ती गोपनीयता द्या. तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.’
Web Title :- Samantha-Naga Chaitanya Angry Photo | samantha ruth prabhu shared ex husband naga chaitanya
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Praniti Shinde On PM Modi | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; म्हणाल्या…