Actress Samantha Ruth Prabhu | समंथा घेणार चित्रपटविश्वातून ब्रेक; निर्मात्यांचे पैसे दिले परत

पोलीसनामा ऑनलाइन- दाक्षिणात्य सिनेमांमध्ये प्रामुख्याने काम करणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभु (Actress Samantha Ruth Prabhu) हिचा मोठा चाहता वर्ग असून तिची लोकप्रियता देशभर आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हि तिच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Actress Samantha Ruth Prabhu) ही चर्चेत आली असून ती आता सिनेविश्वापासून लांब जात असल्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने दाक्षिणात्य सिनेविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. तिची ओटीटी वरील ‘द फैमिली मैन 2’ (The Family Man 2) ही वेबसिरिज खूप गाजली असून दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे. मात्र मोठ्या पडद्यावर अनेक दिवसांपासून समंथाने कोणाताही हिट चित्रपट दिलेला नाही. (Samantha Ruth Prabhu Movie) त्यामुळे अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सिनेविश्वातून ब्रेक घेत आहे. मागील अनेक दिवसांपासून तिच्या आरोग्याशी निगडीत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. (Samantha Ruth Prabhu Healthissue) तरी ती दिलेला शब्द म्हणून चित्रपटांचे शुटिंग पूर्ण करत आहे. मात्र आता ती या दगदगीतून ब्रेक घेणार असून ती तब्बल एक वर्ष तरी कोणताही सिनेमा शुट करणार नसल्याचे समोर येत आहे.

अभिनेत्री समंथा (Actress Samantha Ruth Prabhu) ही अभिनेता वरुण धवनसोबत (Actor Varun Dhawan) ‘सिटाडेल’ या चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच तिने ‘सिटाडेल’ चित्रपटाचे (Citadel Movie) शुटिंग पूर्ण केले आहे. तसेच समंथा दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Actor Vijay Deverakonda) याच्यासोबत ‘खुशी’ चित्रपटात (Khushi Movie) स्क्रीन शेअर करणार असून या चित्रपटाचे शुटिंग सध्या सुरु आहे. खुशी चित्रपटाचे चित्रिकरण येत्या आठवड्यात पूर्ण होणार आहे. यानंतर मात्र समंथा जो चित्रपट करणार होती ते काम तिने नाकारले असून या चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेला अडव्हान्सही समंथाने परत केला आहे. आता ती लॉन्ग ब्रेकवर जाणार असून ती आरोग्यावर लक्ष देणार आहे. यासोबतच ती मायोसिटिसवरही (Myositis) उपचार घेणार आहे. तिचा नुकताच काही महिन्यांपूर्वी अभिनेता नागा चैतन्यसोबत (Actor Naga Chaitanya Divorce) घटस्फोट देखील झाला आहे.

Web Title :   Samantha Ruth Prabhu | samantha ruth prabhu to take break from acting actress returned advance payments to filmmakers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | ‘कोणता पक्ष? कोणता विचार? अन् कसली निष्ठा?’ रोहित पवारांचे खोचक ट्विट; ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले ‘ज्या पिढीला आम्ही डोक्यावर मिरवली…’

Actress Shraddha Kapoor | अभिनेत्री श्रद्धा कपूर पडली आहे प्रेमात; बॉलीवुडच्या ‘या’ व्यक्तीसोबत अफेअरच्या चर्चा

Pune Crime News | कमी किंमतीचे हिरे जास्त किंमतीला देवून 3 कोटी 48 लाखांची फसवणूक ! तनिष्क शोरूममधील सेल्समनला अटक; मॅनेजर, कॅशिअर, बिझनेस मॅनेजर आणि शोरूमच्या मालकाविरूध्द गुन्हा

Chhagan Bhujbal | ‘साहेबांनी मला बोलवलं तर मीपण…’, छगन भुजबळांचं मोठं विधान

Pune Crime News | ‘आयुष’च्या प्रवेश परीक्षेच्या क्लासच्या नावाखाली महिलेशी अश्लिल वर्तन; शिक्षकावर गुन्हा दाखल

Actress Kriti Sanon | अभिनेत्री क्रिती सेनॉन अभिनयाबरोबरच करणार ‘या’ क्षेत्रात काम

Ajit Pawar | तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? अजित पवारांचा शरद पवारांना थेट सवाल