Samantha Ruth Prabhu | समंथा रुथ प्रभूच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन; जवळ घेत फोटो केला शेअर

पोलीसनामा ऑनलाइन – मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही तिच्या अभिनयामुळे व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. समंथाचा चाहता वर्ग मोठा असून तिची सोशल मीडियावर फॉलोविंग जबरदस्त आहे. समंथा सोशल मीडियावर तिच्या लाईफ अपडेट शेअर करत असते. तिने (Samantha Ruth Prabhu) सोशल मीडियावर तिच्या घरी नवा पाहुणा आलेला असून त्यांच्या सोबतचे फोटो शेअर केले आहेत.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने अनेक दाक्षिणात्य हिट चित्रपट (Samantha Ruth Prabhu Hit Movies) दिले आहेत. आता तिने ओटीटी व बॉलीवुडमध्ये (Bollywood News) देखील दमदार एंट्री केली आहे. मात्र तिच्या आजारपणामुळे आरामासाठी तिने कामापासून सुट्टी घेतली आहे. अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने एक वर्षासाठी ब्रेक (Samantha Break) घेतला आहे. आता तिने तिच्या सोबत एक साथीदार आणला आहे. समंथाने नवीन पेट मांजर घेतली (Samantha New Pet) आहे. तिने तिच्या मांजरीचे नाव ‘गिलोटो’ असे ठेवले आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू ही नेहमी प्राण्यांच्या बाबत संवेदनशील असलेली दिसून येते. तिच्याकडे या आधीपासून दोन पाळीव कुत्री आहेत. एकाचे नाव साशा तर दुसऱ्याचे नाव हैश आहे. आता तिच्या या परिवारामध्ये आणखी एका मेंबरची वाढ झाली आहे. समंथाने मांजरीला जवळ घेत त्यांचा क्युट असा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये समंथा रेड कलरच्या नाईट सुट मध्ये दिसून येत आहे. या मधील तिची क्युट मांजर फोटोकडे बघत असून गिलोटोचे डोळे लक्षवेधी ठरत आहे.

समंथा रुथ प्रभूच्या या फोटोला तिने ‘गिलोटो मोर्निग टू यू’ असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस केला आहे. अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या असून लवकर बरी हो असा प्रेमाचा सल्ला देखील दिला आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिने (Samantha Ruth Prabhu) चित्रपट विश्वातून एक वर्षांचा ब्रेक घेतला आहे.
समंथा मायोसिटिस या आजाराने ग्रस्त आहे. (Samantha Ruth Prabhu Healthissue) तिला आरामाची व उपचाराची गरज असल्याने तिने हा लॉन्ग ब्रेक घेतला आहे. समंथा लवकरच अभिनेता वरुण धवनसोबत (Actor Varun Dhawan) ‘सिटाडेल’ या चित्रपटात (Citadel Movie) झळकणार आहे. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता विजय देवरकोंडा (Actor Vijay Deverakonda) याच्यासोबत ‘खुशी’ चित्रपटात (Khushi Movie) स्क्रीन शेअर करणार आहे. या दोन्ही चित्रपटाचे तिने शुटिंग पूर्ण केले आहे. आता ती घरी असून आराम करत आहे.

Electricity Connections In Pune | नवीन वीजजोडणी, नादुरुस्त मीटर बदलासाठी मीटरचा तुटवडा नाही

Delhi Court grants regular bail to BJP MP Brij Bhushan in sexual harass ment case

NCP Political Crisis | शरद पवारांना आणखी एक धक्का, ‘या’ राज्यातील 7 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा

Raigad Irsalwadi Landslide | पावसामुळे इर्शाळवाडीतील बचावकार्य थांबवलं ! 98 जणांना वाचवण्यात यश तर 16 जणांचा मृत्यू; NDRF ची माहिती

ACB Trap News | एन.ए. ऑर्डर काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून लाच घेणाऱ्या महसूल सहायक व पुरवठा निरीक्षकास एसीबीकडून अटक