Sambhaji Bhide । संभाजी भिडेंचं वक्तव्य, म्हणाले – ‘आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्याने कोरोना वाढतोय

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पायी वारी सोहळ्याला परवानगी द्यावी अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) गुरूजी यांनी केलीय. आषाढी वारीला (Pandharpur Ashadhi Wari) परवानगी द्या. वारी होत नसल्याने कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या कोरोना जाईल. यामुळे वारीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी संभाजी भिडे गुरूजी (Sambhaji Bhide) यांनी सांगलीचे (Sangli) जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी (Collector Abhijeet Chaudhary) यांच्याकडे केली आहे.

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

संभाजी भिडे गुरुजी (Sambhaji Bhide) यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना याबाबत निवेदन देत मागणी केली आहे. त्यावेळी संभाजी भिडे म्हणाले, वारी झाल्यानंतर देशातला नाही तर जगातला कोरोना आटोक्यात नव्हे तर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्या की सर्व विघ्न नाहीशी होतात, त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी, असे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले.

पुढे ते म्हणाले, ‘मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, अशी देखील मागणी त्यांनी केलीय. तर दारूच्या दुकानात जाणाऱ्या तरुणांना पोलीस अडवत नाहीत. पण विना मास्क फिरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड केला जातो, असं देखील संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी म्हटलं आहे.

 

संभाजी भिडे यांनी दिलेल्या निवेदनात काय म्हटलं आहे?

‘पायी वार्‍या करणारे लाखो वारकरी आहेत. आळंदी ते पंढरपूर (Alandi to Pandharpur) आणि देहू ते पंढरपूर (Dehu to Pandharpur) असे लाखो वारकरी पायी वारी करतात. वर्षानुवर्षे ही परंपरा आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे वारीची परंपरा खंडीत झाली. मात्र यावर्षी पंढरीच्या वारीसाठी वारकरी उत्सुक होते. सद्यपरिस्थितीत राज्यातील काही जिल्हे वगळता कोरोनाचा संसर्ग कमी झालेला दिसत आहे.

राज्यात इतर सर्व राजकीय कार्यक्रम सुरु आहेत.
वारकऱ्यांनी सरकारच्या सर्व नियमांचं पालन करुन वारीमध्ये सहभागी होऊ असं मान्य केलं होतं.
मात्र असं असतानाही चर्चेचे निमित्त करून केवळ शंभर जणांना घेऊन पालख्या निघाव्यात असे आश्वासन देण्यात आलं.
मात्र प्रत्यक्षात शंभर जणांची पायी वारीही अमान्य करून पुन्हा बसनेच संताच्या पादुका पंढरपूरपर्यंत नेण्याचे निश्चित केलं गेलं.
हा सरकारकडून वारकऱ्यांचा झालेला विश्वासघात आहे.
असं त्या निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, पंढरपूर वारीची परंपरा खंडीत होऊ नये यासाठी पायी दिंडीला परवानगी देण्यात यावी.
असं त्यात म्हटलं आहे.

Web Titel :- sambhaji bhide request to allowed for ashadhi wari 2021

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharera | महारेराचा मोठा निर्णय ! ‘त्या’ बिल्डरांना बसणार चाप

Covishield | ऑक्सफर्डचे नवे संशोधन ! ‘कोविशील्ड’चा तिसरा डोस घेतल्यास कोरोनापासून अधिक सुरक्षा

Pune News | पुण्यात भाजप नगरसेविकेच्या पती आणि भावाकडून रहिवाशाला मारहाण, व्हिडीओ व्हायरल