संभाजी भिडेंवर बदनामीचा गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

संघटनात्मक बांधणी करुन हजारो अनुयायांना आपल्या मार्गावर चालायला मनुने शिकवले. हा मनु संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा श्रेष्ठ होता”, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी शनिवारी (7 जुलै) जंगली महाराज मंदिरात आपल्या धारकऱ्यांना संबोधित करताना केले होते. संभाजी भिडेंचे वक्तव्य वादग्रस्त व संविधान विरोधी आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून महापुरुषांची बदनामी करण्यात आली आहे. असे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे असून त्यांनी महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी भिडेंवर गुन्हा दाखल करण्याचा तक्रार अर्ज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिला आहे.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’472ea583-837d-11e8-9824-dbb5a64be7b4′]

भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विविध स्तरातून टीका झाली. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात भिडेंचे वक्तव्य तपासून ते संविधान विरोधी असल्यास कारवाई करु असे आश्वासन दिले.

संभाजी ब्रिग्रेडने दिलेल्या अर्जात म्हंटले आहे की,  जंगली महाराज मंदिरात शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे संभाजी भिडे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. या व्याख्यानात भिडे यांनी मनुस्मृतीचे जाहीर समर्थन केले आहे. हे संविधान विरोधी आहे. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी असे आक्षेपार्ह व संतापजनक वक्तव्य केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून आमच्या महापुरुषांची बदनामी करण्यात आलेली आहे.  मनुस्मृतीचे समर्थन करणे व महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या जगतगुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांना कमी लेखने, त्यांचा अवमान करणे हे वादग्रस्त आहे. या आगोदर नाशिक व धुळे येथे मनुस्मृतीचे समर्थन भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यांमुळे समाजात सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होऊ शकते. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन भिडे यांच्यावर महापुरुषांच्या बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ यांनी हा तक्रार अर्ज शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये दिला.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’60bb055d-837d-11e8-b817-97fc0409e4e4′]