पालकमंत्र्यांकडून वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड यांनी हजारो कार्यकर्त्यांसह वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली केल्याचे समोर आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती, संभाजी पाटील निलंगेकर आणि खासदार सुनील गायकवाड यांच्याकडून विजय संकल्प यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो कार्यकर्त्यांसह संपूर्ण शहरात रॅली काढण्यात आली. वाहतूकीचे नियम मोडत ही बाईक रॅली शहरभर सुरु होती. मात्र, या मंत्री महोदयांना प्रश्न विचारण्याची पोलीसांची हिम्मत झाली नाही.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच वाहतूकीचे नियम दाखवत पोलीसांनी 22 काळीपिवळी प्रवाशी वाहतूक गाड्यांवर कारवाई केली होती. तसेच शहरातील चौकांमध्ये उभे राहून वाहतूकीचे उल्लंघन करणाऱ्या अनेक नागरिकांना दंड आकारण्यात येतो. मात्र, पालमंत्र्यांच्या या रॅलीने दिवसभर वाहतूकीचे उल्लंघन केले. त्यांना वाहतूक पोलीसांकडून नियमांच्या उल्लंघनाबाबत एक प्रश्नही विचारता आला नाही. त्यामुळे लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांचे या रॅलीला समर्थन होते की काय, असा प्रश्न लातूरात निर्माण झाला आहे.

झालेल्या प्रकारावर पोलीस अधीक्षक आणि वाहतूक शाखा कारवाई करणार की त्यांना अभय देणार याकडे सर्व लातूरकरांचे लक्ष लागले आहे.

You might also like