Sameer Wankhede | वानखेडेंच्या विरोधात दलित संघटना आक्रमक, जात पडताळणी समितीकडे केली तक्रार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  एनसबीचे (NCB) मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणी (Cruise Drugs Party case) वानखेडे यांचीच चौकशी होत असताना राष्ट्रवादीचे नेते (NCP) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडे यांचा जातीचा खोटा दाखला (False caste certificate) दाखवून नोकरी (JOB) लाटल्याचा आरोप केला आहे. त्यात आता दलित संघटनाही (dalit organisation) आक्रमक झाल्या असून समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात जात पडताळणी समितीकडे (Caste Verification Committee) तक्रार केली आहे.

 

नोकरी मिळवण्यासाठी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी स्वत:ला दलित असल्याचं दाखवलं असा दावा दलित संघटनांनी केला आहे.
नोकरीतील आरक्षण प्राप्त करण्यासाठी वानखेडे यांनी खोटी कागदपत्र सादर केली असा आरोप स्वाभीमानी रिपब्लिकन आर्मी
(Swabhimani Republic Party) आणि भीम आर्मीनं (Bhim Army) केला आहे.
या दोन्ही दलित संघटनांनी जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली आहे.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांनी दिल्लीतील अनुसूचित जाती आयोगाच्या (Scheduled Castes Commission)
कार्यालयात हजर राहून त्यांच्या जवळील सर्व कागदपत्रे सादर केली होती.
आयोगासमोर वानखेडे यांनी पहिल्या पत्नीकडून झालेल्या मुलाचा जन्म दाखला आणि घटस्फोटाची कागदपत्रं सादर केली.
आयोगाकडून या कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे. मात्र त्यापूर्वीच वानखेडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

 

Web Title : Sameer Wankhede | dalit organisations bhim army complain ncb officer sameer wankhede over fake paper sc community

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maharashtra | महाराष्ट्राच्या पैलवान भावेशने 130 किलोच्या पैलवानाला हरवून गाजवली दिल्ली

Chandrakant Patil | ‘एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हे हास्यास्पद’ – चंद्रकांत पाटील

Pune Traffic Police | दिपोत्सवानिमित्त सारसबाग, स्वारगेट परिसरातील वाहतुकीत बदल