Maharashtra | महाराष्ट्राच्या पैलवान भावेशने 130 किलोच्या पैलवानाला हरवून गाजवली दिल्ली

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra | सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या खोपिवली खेडेगावातील कु. भावेश मुकुंद धुमाळ (Bhavesh Mukund Dhumal) यांनी कुस्तीची स्पर्धा जिंकून दिल्ली वर विजयाचा झेंडा रोवला असून तालुक्यातील खोपिवली या गावात अनेक वर्षांपासून कुस्तीचा पारंपरिक खेळ होत असून अनेक अडचणींना तोंड देऊन भावेश धुमाळ यांनी तालुक्या सह महाराष्ट्र राज्याचा नाव दिल्लीला कोरले असून भावेश चे सर्व स्तरावरु अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, भावेषच्या या विजयाने तालुक्यातील कुस्ती पाहिलवांनाच्या भावना जागरूक होऊन एक नवीन ऊर्जा मिळाली (Maharashtra) आहे.

मुरबाड तालुक्यातील मौजे खोपिवली गावचा भावेश धुमाळ रहिवासी असून, येथील परंपरागत चालत आलेला कुस्ती खेळ असून भावेश ने अनेक स्पर्धा जिकल्या अनेक ठिकाणी कुस्ती पाहिलवांनाना धूळ चारून विजय मिळवून भावेशची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत निवड झाली. त्यात 96 किलो वजन असलेल्या भावेश ची कुस्ती बलदंड असलेला 130 किलो वजनाच्या हरियाणातील पैलवानासोबत कुस्ती लढविण्यात आली. त्यात त्या बलाढ्य पैलवानास पराभूत केल्याने भावेश यास रौप्यपदक देवुन गौरविण्यात आले. ह्या कामगिरी बद्दल आज त्याचा खोपिवली ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी कार्यक्रमासाठी पाहुणे माजी पर्यटन मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार किसन कथोरे, माजी आमदार दिगबंर विशे, जि. प. सदस्य सुभाष घरत, माजी सभापती उल्हास बांगर, सभापती दिपक पवार, मुरबाड काँग्रेस तालुका अध्यक्ष चेतनसिह पवार, यांसह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते, व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित (Maharashtra) होते.

 

 

कार्यक्रमा प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा,
आई भवानीचे उपकार अन गाजली आई भवानीची तलवार पोवाडे सादर करून
कार्यक्रमाला रंगत आणली तर गावकऱ्यांनी संपूर्ण गावात रांगोळ्या घालून जोरदार मिरवणूक काढून विजयाचा जल्लोष साजरा केला.
या वेळी आमदार कथोरे यांनी कुस्ती करीता मैदान, साहित्य,
भाविकालात उच्च स्तरावर खेळा करिता येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन देऊन
भावेशला सुवर्ण पदक मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या
तसेच भावी पैलवान घडविण्यासाठी नागाव येथील 40 एकर जागेत क्रिडा संकुल बांधणार असल्याचे शब्द नागरिकांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत दळवी युवा विकास मंच संस्थापक अध्यक्ष भरत दळवी यांनी केले.
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Mos Kapil Patil) यानी भावेशला शुभेच्छा पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या.

 

Web Title :- Maharashtra | Bhavesh, a wrestler from Maharashtra, defeated a 130 kg wrestler in Delhi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा