Pune High Temperature News | पुणेकरांना उन्हाच्या धारा सोसवेनात! येत्या आठवड्यातही पारा होणार 40 च्या पार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune High Temperature News | उन्हाने पुणेकरांना अक्षरश: वैतागून सोडले आहे. इतक्या दिवसांनंतरही पुण्यातील तापमान कमी होण्याचे नाव घेत नाही, आणखी काही दिवस पुणेकरांना उन्हाचा कडक पारा सहन करावा लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Pune High Temperature News) पुढील तीन ते चार दिवस पुण्यात तापमान उच्चांक गाठेल आणि 41 अंश सेल्शिअसच्या वर तापमानाचा पारा चढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे येणाऱ्या आठवड्यातही पुण्यात सुर्य आग ओकणार असे चित्र आहे.

पूर्वी पुणे शहर त्याच्या आल्हादायक वातावरणामुळे सुप्रसिद्ध होते. उन्हाळ्यासाठी काही लोक खास पुण्यामध्ये
येत असतं. आता मात्रा पुणेकरांनाही शहराचा एवढा कडक उन्हाळा (Summer) सहन होईनासा झाला आहे. या वाढत्या उन्हामुळे पुण्यात जागोजागी शुकशुकाट बघायला मिळत आहे. अत्यावश्यक कामांशिवाय भर दुपारी पुणेकरांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याने (Meteorological Department) केले आहे. शनिवारी जिल्ह्यातील शिरूरचे (Shirur) तापमान सर्वांधिक झाले असून, ४२ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. तर मगरपट्टा (Magarpatta), लवळे (Lavale) आणि कोरेगावचे (Koregaon) तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक होते. लोणावळामध्ये (Lonavala) ३४.५ अंश सेल्शिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. अन्य सर्व ठिकाणी तापमान 35 ते 40 अंश सेल्शिअस होते.

अगदी काही दिवसांत मान्सून (Monsoon Update) भारताच्या उंबरठ्यावर येणार आहे.
दक्षिण-पश्चिम मान्सून शुक्रवारी निकोबार (Nicobar Island) बेटावर दाखल झाला आहे.
आयएमडीने India Meteorological Department (IMD) 4 जूनपर्यंत केरळ (Kerala) किनारपट्टीवर
मान्सून पोहोचण्याची शक्यता देखील वर्तवली आहे.
हवेत प्रमाणापेक्षा अधिक आर्द्रता असल्याने रात्रीचे तापमान वाढले आहे.
हवामान विभागानुसार पुणे जिल्हा (Pune District) व परिसरातील तापमान 26 मेपर्यंत पारा 40 ते 41 अंशा
दरम्यान राहणार आहे. किमान तापमान 24 ते 26 डिग्री सेल्शिअस राहील,
असा अंदाज हवामान खात्याने सांगितला आहे. (Pune High Temperature News)

Web Title :  Pune High Temperature News | Pune residents can not bear the heat! The mercury will cross 40 in the coming week as well

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

RBI Governor Shaktikanta Das | 2000 रुपयांच्या नोटबंदीनंतर आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले -‘…म्हणून नोटा बंद केल्या’ (व्हिडिओ)

Keshav Upadhye On Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

Jayant Patil ED Inquiry | ‘2024 नंतर ईडी कार्यालयात कोणाला पाठवायचे, याद्या तयार करायला घेतल्या’, जयंत पाटलांच्या ईडी चौकशीवरुन ठाकरे गटाचा इशारा