Sameer Wankhede-Nawab Malik | समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडेंची नवाब मलिकांविरोधात हाय कोर्टात पुन्हा याचिका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sameer Wankhede-Nawab Malik | मागील काही महिन्यामध्ये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यात जोरदार शीतयुद्ध पाहायला मिळालं. दोघांत आरोपांच्या फैरी झडल्या. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. त्यादरम्यान आता समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नवाब मलिकांविरोधात मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल केली आहे. (Sameer Wankhede-Nawab Malik)

 

मागील काही महिन्यामध्ये नवाब मलिक यांनी उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सांगितले होते की, वानखेडे यांच्याविरोधात कुठलेही आक्षेपार्ह वक्तव्य करणार नाही. त्याचबरोबर, हाय कोर्टात नवाब मलिक यांनी बिनशर्त माफी देखील मागितली होती. दरम्यान, जानेवारीमध्ये सुरूवातीला नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबियांच्या विरोधात काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. असा आरोप समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे. या कारणामुळे त्यांनी थेट हाय कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करत ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिकांविरोधात हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे. (Sameer Wankhede-Nawab Malik)

दरम्यान, आपला मुलगा (समीर वानखेडे) आणि कुटुंबातील इतर सदस्यां बाबत बदनामीकारक आणि अपमानास्पद टिप्पणी आणि पोस्ट करण्यापासून नवाब मलिक यांना रोखण्यासाठी मागील वर्षी ज्ञानदेव वानखेडे यांनी खटला दाखल केला होता. दरम्यान, नवाब मलिक यांनी ’10 डिसेंबर 2021 रोजी प्रतिज्ञापत्राद्वारे बिनशर्त माफी मागितली होती’ आणि 10 डिसेंबर 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार, न्यायालयाने त्यांची बिनशर्त माफी स्वीकारली होती. मात्र जानेवारी महिन्याच्या सुरूवातीला त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप ज्ञानदेव वानखेडे यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

 

Web Title :- Sameer Wankhede-Nawab Malik | sameer wankhede father files contempt petition against nawab malik before Mumbai high court

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Shilpa Shetty | ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात वेडी झालेली शिल्पा शेट्टी, स्वत:वर नियंत्रण ठेवू शकले नाही; लग्नाचे नाटक करून घेतला भरपूर फायदा

 

Multibagger Penny Stock | दोन रुपयांचा शेयर झाला 178 रुपयांचा, 1 लाख झाले 73 लाख, तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

 

Tata Group Best Stock | टाटा समूहातील ‘हा’ सर्वोत्तम स्टॉक; गुंतवणूकदारांचं बनलाय आकर्षण; जाणून घ्या