Sameer Wankhede | आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणाच्या (Aryan Khan Drugs case) तपासातून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना हटवण्यात आले आहे. आता एनसीबीची नवी टीम मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणाची चौकशी (Mumbai Cruise Drugs Case) करणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCB) नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांचे जावई समीर खान (Sameer Khan) यांच्या केसचा देखील समावेश आहे. समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर वसुलीचे आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, समीर वानखेडे यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

 

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणातून समीर वानखेडेची (Sameer Wankhede) हकालपट्टी केल्यानंतर दिल्ली एनसीबीचे (Delhi NCB) एक पथक उद्या म्हणजे शनिवारी (दि.6) मुंबईत येत आहे. हे पथक मुंबई झोनलमधील आर्यन खान प्रकरणासह इतर 5 अशा 6 प्रकरणांची चौकशी (Inquiry) करणार आहे.

 

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, एनसीबीचे उपमहासंचालक (Deputy Director General, NCB) मुथा अशोक जैन (Mutha Ashok Jain) म्हणाले, आमच्या झोनच्या एकूण 6 प्रकरणांची चौकशी आता दिल्लीच्या एनसीबी पथकांकडून केली जाईल, ज्यामध्ये आर्यन खानचे प्रकरण आणि इतर 5 प्रकरणांचा समावेश आहे. हा प्रशासकीय निर्णय होता.

 

 

समीर वानखेडे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मला तपासातून वगळण्यात आलेले नाही.
या प्रकरणाचा तपास कोणत्या तरी केंद्रीय एजन्सीमार्फत (central agency) व्हावा,
अशी माझी न्यायालयात याचिका देखील केली होती.
त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान प्रकरणाचा तपास दिल्ली एनसबीची एसआयटी (SIT) करत आहे.
दिल्ली आणि मुंबईच्या एनसीबी संघामध्ये एक समन्वय असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

 

Web Title :- Sameer Wankhede | NCB Officer sameer wankhede says wanted matter to be probed by central agency not removed as probe officer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा