Sameer Wankhede Property | समीर वानखेडेंची ‘इतकी’ आहे संपत्ती ! जाणून घ्या कुठं किती एकर जमीन अन् किती फ्लॅट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sameer Wankhede Property | कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज (Mumbai Drug Case) कारवाईनंतर वादात सापडलेले एनसीबीचे मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर रोज नवनवीन आरोप करण्यात येत आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) समीर वानखेडेंकडे बेहिशोबी मालमत्ता (Sameer Wankhede Property) असून उंची कपडे, घड्याळे वापरत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले आहे. मलिकांनी केलेल्या आरोपाला वानखेडे कुटुबियांनी सडेतोड उत्तर दिल आहे. यातून मात्र समोर वानखेडे यांची किती संपत्ती आहे हे समोर आले आहे.

 

समीर वानखेडे हे दरवर्षी नियमानुसार त्यांच्या मालमत्तेची माहिती संबधित विभागासमोर सादर करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार समीर यांच्याकडे वडिलोपार्जित मालकीची वाशिम जिल्ह्यात ४ एकर जमीन आहे. त्यांची आई जाहिदा वानखेडे यांनी २००४ मध्ये मुंबईत ८०० चौरस फुटाचे घर समीर यांना दिले. याशिवाय आई जाहिदा यांच्या नावावर १९९९मध्ये घेतलेला एक फ्लॅट नवी मुंबईत आहे. (हा फ्लॅट सुमारे ७०० चौरस फूट आहे).

 

नवी मुंबईत १९९५ मध्ये घेतलेला एक हजार १०० चौरस फुटाचा भूखंड भाड्याने देण्यात आला आहे. तर समीर यांच्या मावशीला मुलबाळ नव्हते. त्यामुळे मावशीने त्यांचे सुमारे एक हजार चौरस फुटांचे अंधेरीतील कार्यालय समीर वानखेडे Sameer Wankhede Property (मुंबईत) यांना दिले. कर्करोगाने मावशीचा मृत्यू झाला.

 

२०१६ मध्ये समीर वानखेडे यांनी ११०० चौरस फुटाचा फ्लॅट खरेदी केला होता. हा फ्लॅट खरेदीसाठी क्रांती रेडकर यांनी त्यांचा म्हाडाचा फ्लॅट विकला. वडिलांच्या पेन्शनचे पैसे आईच्या मृत्यूनंतर एलआयसीचे पैसे मिळाले आणि २०१६ ते २०२१ पर्यंतचे पगाराचा काही भागाची वापर केला. याशिवाय मलिक यांनी ज्या घड्याळाचा उल्लेख केला होता, ते घड्याळ (सीमास्टर) हे २००५ मध्ये समीर यांच्या आईने ५५ हजार रुपयांना विकत घेतले होते. ते भेट म्हणून समीर यांना दिले होते. त्यावेळी समीर वानखेडे (Sameer Wankhede Property) यांची पहिली सरकारी नोकरी केंद्रीय पोलीस संघटनेची होती. अंधेरी लोखंडवालाच्या सामान्य दुकानातून शूज आणि कपड्यांची खरेदी झाली आहे.

 

कोण होत्या जाहिदा वानखेडे?

समीर वानखेडे यांच्या आई जाहिदा या एक व्यापारी होत्या. त्यांचा भंगारचा व्यवसाय होता.
जाहिदा यांच्या आई दुर्गा यांच्या नावाने एक एनजीओ होती. त्याचबरोबर एक अनाथालयही त्या चालवत होत्या.
त्यांचे २०१५मध्ये निधन झाले. समीर वानखेडेंचे आजोबा म्हणजेच के जाहिदा वानखेडे यांचे वडील हरियाणातील मुरथल येथील आहेत
आणि ते सुद्धा राजघराण्यातील होते. समीर यांची आजी सुरतची असून ती देखील खूप श्रीमंत कुटुंबातील होती.

 

Web Title :- Sameer Wankhede Property | ncb officer sameer wankhedes property information know in details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Price Today | दिवाळीच्या एक दिवस अगोदर सोन्याच्या किमतीत जोरदार घसरण, आज 3,000 पर्यंत स्वस्त मिळतेय

Modi Government | खुशखबर ! शेतकरी आता विना गॅरंटी घेऊ शकतील 1.60 लाख रुपयांचे कर्ज, जाणून घ्या कसा घ्यावा फायदा

Pune Crime | पुण्यात अश्लिल पोस्ट टाकून 36 वर्षीय डॉक्टर तरुणीची बदनामी; शरीरसुखाची मागणी करणार्‍या फोनवरुन प्रकार उघडकीस