Samruddhi Mahamarg Accident | समृद्धी महामार्गावरील अपघाताचे चक्र थांबेना; कारची ट्रकला धडक, दोन महिला डॉक्टरांसह तिघे ठार

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg Accident) जाणार्‍या वाहनांच्या दररोज अपघाताच्या बातम्या येत असून त्यात अनेक जणांचा मृत्यु होताना दिसत आहे. यवतमाळकडून नागपूरकडे जाणार्‍या वॅगनार कारने पुढील ट्रकला दिलेल्या धडकेमध्ये दोन महिला डॉक्टरांसह तिघांचा मृत्यु (Death) झाला. हा अपघात (Samruddhi Mahamarg Accident) इतका भीषण होता की कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यास पोलिसांना तब्बल दोन तास लागले.

 

डॉ. ज्योती क्षीरसागर Dr. Jyoti Kshirsagar (रा. मालेगाव, जि. वाशीम) डॉ. फाल्गुनी सुरवाडे Dr. Falguni Surwade (रा. अमरावती), भरत क्षीरसागर Bharat Ksheersagar (रा. मालेगाव, जि. वाशीम) अशी मृत्यु पावलेल्यांची नावे आहेत. समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg Accident) सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात मध्यरात्री साडेबारा वाजता हा अपघात झाला.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवाडे आणि क्षीरसागर या दोघी मैत्रिणी डेंस्टि डॉक्टर आहेत. यवतमाळकडून नागपूरकडे एक ट्रक चालला होता. त्याच्या पाठीमागून वॉगनार कारमधून तिघे जण चालले होते. कार महिला चालवित होती. कार वेगाने जात असताना चालकाला पुढील ट्रक दिसला नाही. कार जवळ गेल्यानंतर तिच्या उजेडात ट्रक दिसला. परंतु अतिवेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व कारने ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. अपघाताचे वृत्त समजताच जाम महामार्ग पोलीस चौकीचे (Jam Highway Police Chowki) उपनिरीक्षक दिलीप थाटे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहचले. अपघातातील कारमध्ये तिघे जण अडकले होते. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्यांना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले.

 

सरळसोट महामार्गामुळे चालकांचे वेगावर नियंत्रण रहात नाही. त्यातून समृद्धी महामार्गावरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

 

Web Title :  Samruddhi Mahamarg Accident | The cycle of accidents on Samriddhi Highway does not stop;
Car collides with truck, three killed including two women doctors

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा