‘या’ मोठया कंपनीची फ्रिजवर बंपर ऑफर ! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत अन् 9 हजारांचा कॅशबॅकही

नवी दिल्ली : स्पेसमॅक्स फ्रिजसोबत कंपनीने 37,999 रुपयांचा Samsung Galaxy Note 10 Lite स्मार्टफोन मोफत दिला जाणार आहे, अशी घोषणा केलीय. तसेच 9000 रुपयांचा कॅशबॅकही दिला जाणार आहेत. या फ्रिजमध्ये अनेक फिचर दिलेत. हा फ्रिज 13 ते 26 जुलैदरम्यान बुक केल्यास ग्राहकाला हा कॅशबॅक मिळणार आहे.

सध्या चीनविरोधी वातावरण असल्याने भारतात त्याचा फायदा अन्य देशांच्या कंपन्या घेऊ लागल्यात. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने भारतात Internet of Things उत्पादनांची रेंज वाढविण्याचे ठरविले. यानुसार SpaceMax Family Hub Refrigerator भारतात लाँच करून यावर मोठी ऑफरही दिली आहे.

प्रिमिअम ब्लॅक मॅट फिनिशच्या रेफ्रिजरेटरची किंमत 2,19,900 रुपये इतकी आहे. हा फ्रिज 1,96,990 रुपयांच्या स्पेशल किमतीत मिळणार आहे. या फ्रिजची स्टोरेज 657 लीटर आहे. हा घरातील अन्य स्मार्ट होम अल्पायन्सेससोबत जोडला जात आहे. याचा होम कंट्रोल आणि फॅमिली हब स्क्रीन फिचरद्वारे ग्राहक नियंत्रित करता येते. यामध्ये एक फूड मॅनेजमेंट फिचर दिले आहे. याद्वारे दरवाजा न उघडता आतमध्ये ठेवलेले पदार्थ सहज तपासता येतात.

रेफ्रिजरेटरच्या दरवाजावर 21.5 इंचाचा फुल एचडी टचस्क्रीन दिली आहे. ही 15 वॉटच्या स्पिकरसोबत येते. युजर यामध्ये स्मार्टफोन किंवा टीव्हीच्या स्क्रीनला मिरर करता येते. फॅमिली हब स्क्रीनवर मिरर करण्यासाठी होम एंटरटेनमेंट फीचरचा वापर करावा लागणार आहे. याशिवाय टेक्स्ट मेसेजही पाठविता येणार आहे. या रेफ्रिजरेटरमध्ये ब्ल्यूटूथ आणि Bixby व्हॉईस असिस्टंसचा सपोर्ट दिला आहे.

फ्रिजमध्ये ऑलराऊंड कुलिंग दिले आहे. याचा डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी 50 टक्के वीज वाचविते, असा दावा कंपनीने केला असून कुबट वास न येण्यासाठी डिओडराइजिंग फिल्टर दिले आहे.