मुंबईराजकीय

Sandeep Deshpande | ‘सोळा वर्षांपूर्वी आम्हीच तुमची गाडी पलटी केली होती, आता…’; मनसेचा राऊतांना इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sandeep Deshpande | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्धापन दिनी (MNS) शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार (Sanjay Raut) संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. संजय राऊत यांची मिमिक्री राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर मनसे नेत्यांनी संजय राऊतांना निशाण्यावर धरायचं ठरवलं असल्याचं दिसत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी 16 वर्षांपुर्वीचा एक फोटो शेअर करत संजय राऊतांवर टीका केली आहे.

 

सोळा वर्षांपूर्वी आम्हीच तुमची गाडी पलटी केली होती, या निवडणुकीतही (Elcection) आम्हीच तुमची गाडी पलटी करणार,
असं म्हणत संदीप देशपांडे यांनी राऊतांना निवडणुकीअगोदर इशारा दिल्यासारखं आहे.
याबाबत त्यांनी ट्विट केलं असून त्यासोबत ज्यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (Shivsena) पक्ष सोडला होता त्यावेळी राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करताना संजय राऊत यांची कार पलटी केली होती.

 

याआधीही संजय राऊत यांच्यावर देशपांडेंनी टीका केली होती. त्यावेळी,
जेलमध्ये गेल्यावर काही लोक पुस्तके (Books) तर औषधे (Medication) मागतात आणि काहींना घरचं जेवण लागतं.
मात्र पुढे काही लोक जेलमध्ये सकाळी पत्रकार परिषद (Press Conference) घ्यायची परवानगी मागतील,
असं म्हणत देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी अप्रत्यक्षपणे राऊतांना नाव न घेता टोला हाणला.

 

दरम्यान, मनसे नते संदीप देशपांडे यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Sandeep Deshpande | sixteen years ago we were the ones who turned over your car now mns scolded sanjay raut again sandeep deshpande

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

Back to top button