Sandeep Khardekar | सामुदायिक मुंजीत 31 बटुंवर संस्कार संपन्न ! मोबाईल युगात मुलांवर मौजीबंधनाचे संस्कार महत्वाचे – संदीप खर्डेकर

सत्तर (70) वर्षे सामुदायिक व्रतबंधाचे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या याज्ञवल्क परिवाराचे स्पृहणीय कार्य - महेश दामोदरे.

पुणे : Sandeep Khardekar | मोबाईल युगात मुलांवर मौजीबंधनाचे संस्कार महत्वाचे असून लहान वयातील संस्कार आजन्म उपयोगी पडतात असे भाजप चे राज्य प्रवक्ते संदीप खर्डेकर म्हणाले. याज्ञवल्क परिवाराचे कौतुक तर आहेच पण सामुदायिक मौजिबंधनाच्या कार्यक्रमात आपल्या मुलांवर धार्मिक संस्कार करणारे पालकांचे ही विशेष कौतुक करावे वाटते, सध्या ची पिढी ही टीव्ही आणि मोबाईल मुळे वाहवत चालली असल्याची सर्वसाधारण धारणा आहे, मात्र योग्य वयात संस्कार केले तर ते आजन्म मनावर बिंबवले जातात आणि ही मुले पुढे जाऊन स्वतः चे कुटुंबासह समाजाच्या आणि देशाच्या उभारणीत ही हातभार लावतात असे ही संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar) म्हणाले.

याज्ञवल्क परिवाराच्या वतीने आयोजित सामुदायिक व्रतबंध समारंभात ते बोलत होते.यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर (Manjushri Sandeep Khardekar) , नगरसेवक योगेश समेळ (Yogesh Samel), शाहीर हेमंत माळवे (Shaheer Hemant Malve), संस्थेचे कार्याध्यक्ष जगदीश नगरकर (Jagdish Nagarkar), सचिव मनोज तारे (Manoj Tare), समुद्र व इतर मान्यवर उपस्थित होते.

सातत्याने सत्तर वर्षे हा उपक्रम राबविणाऱ्या देशस्थ यजुर्वेदी माध्यंदिन ब्राह्मण मंडळ, याज्ञवल्क आश्रमाचे कार्य स्पृहणीय असल्याचे प्रमुख पाहुणे , प्रसिद्ध उद्योजक महेश दामोदरे म्हणाले.तसेच हे कार्य अविरत सुरु रहावे यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे ही त्यांनी जाहीर केले. (Sandeep Khardekar)

यावेळी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या वतीने सर्व बटुंना बॅग, डबा व पाण्याची बाटली भेट
देण्यात आली. तसेच पुढील वर्षी सामुदायिक मुंजी चा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करावा त्यासाठी आवश्यक ती
सर्व मदत करू असेही चंद्रकांत पाटील यांच्या वतीने संदीप खर्डेकर यांनी जाहीर केले.

मुंजीचे पौरोहित्य अक्षय शेलगावकर (Akshay Shelgaonkar) यांनी, सूत्रसंचालन यशश्री पुणेकर
(Yashshree Punekar) यांनी केले.जगदीश नगरकर यांनी स्वागत तर मनोज तारे यांनी आभार प्रदर्शन केले.

Web Title :-   Sandeep Khardekar | Sanskar completed on 31 dwarfs in the community! In the age of mobile, the culture of fun is important for children – Sandeep Khardekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह 16 आमदार, मंत्र्यांवर अपात्रतेची टांगती तलवार, ते 16 आमदार कोण? संपूर्ण यादी

Maharashtra Politics News | ‘मविआचे नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय’

Maharashtra Political Crisis | सत्तासंघर्षावर उद्या निकाल, राज्यात हालचालिंना वेग; दोन्ही गटाचे शिलेदार दिल्लीला रवाना