Sandeep Pawar Murder Case | नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात पुण्यातील गँगस्टर सुनिल वाघ पोलिसांच्या जाळ्यात; आतापर्यंत 24 जणांना अटक

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sandeep Pawar Murder Case | पंढरपूर येथील नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणातील (Corporator Sandeep Pawar Murder Case) फरारी असणाऱ्या पुण्यातील एका गॅंगमधील सुनील वाघ (Sunil Wagh) याला पोलिसांनी कर्नाटकातील म्हैसूर येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कारवाई पंढरपूर पोलिसांनी (Pandharpur Police) शुक्रवारी केली आहे. संदीप पवार खून (Murder) प्रकरणावरून जवळपास 24 जणांना अटक (Arrested) केली होती. परंतु, पुण्यातील प्रसिद्ध गॅंगमधील सुनील वाघ हा तेव्हापासून फरार होता. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

2018 साली स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलात नगरसेवक संदीप पवार याची बंदुकीने गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करून हत्या (Murder) करण्यात आली होती. या प्रकरणावरून जवळपास 24 जणांना अटक केली होती. तेव्हापासून सुनील वाघ हा फरार होता. सुनील वाघ याचा शोध घेण्याचे काम पोलिस मागील अनेक काळापासून करत होते. मात्र कर्नाटकातील म्हैसूर येथे तो सापडला आहे.

दरम्यान, सुनील वाघ (Sunil Wagh) हा कर्नाटकातील म्हैसूर येथे नाव बदलून राहत असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली होती. तसेच, तेथून सुनील भागवत (Sunil Bhagwat), सचिन देवमारे (Sachin Devmare) या दोघांनाही पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पंढरपूर पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम (DySp Vikram Kadam), पोलिस निरीक्षक अरुण पवार (police inspector Arun Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस हवालदार शरद कदम, सुरज हेंबाडे, राजेश गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल बनसोडे, सुजित जाधव, विनोद पाटील यांनी केलीय.

Web Title : sandeep pawar murder case pandharpur police arrested gangstar sunil wagh from karnataka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page
and Twitter for every update

COVID-19 in India | कोरोनाचा ग्राफ भीतीदायक ! देशात गेल्या 24 तासात आल्या 46759 नवीन केस, 509 जणांचा मृत्यू

Pune Crime | भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल;
जाणून घ्या प्रकरण

NEET-UG 2021 Exam News | नीट यूजी 2021 परीक्षा होणार नाही स्थगित,
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने दिली माहिती

Pune Gang Rape Case | धक्कादायक ! पुण्याच्या दत्तवाडीत 25 वर्षीय तरूणीवर सामुहिक बलात्कार, प्रचंड खळबळ

Govt Yojana | जर तुमच्या मोबाइलमध्ये सुद्धा आलाय ‘हा’ मेसेज तर व्हा सावध, जाणून घ्या काय लिहीलंय त्यामध्ये ?