Sangali Accident News | दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या गाडीचा भीषण अपघात

एकाचा मृत्यू, 3 जखमी; रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangali Accident News | देशात आज दसऱ्याचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. दसरा सण आणि दसरा मेळावा (Dussehra Melava) ही शिवसेना (Shivsena) पक्षाची परंपरा आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन दसरा माळावे पार पडत आहेत. यंदा शिवाजी पार्कवर (Shivaji Park) ठाकरे गटाचा (Thackeray Group) दसरा मेळावा होत आहे. तर आझाद मैदानावर शिंदे गटाचा (Shinde Group) दसरा मेळावा होत आहे. एकीकडे दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, तिकडे सांगलीच्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा मोठा अपघात (Sangali Accident News) झाला आहे.

मुंबईतील आझाद मैदानावर होत असलेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीचा मंगळवारी (दि.24) पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कवठेमहंकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Ratnagiri-Nagpur National Highway) शिरढोण गावाजवळ ही घटना घडली आहे.

एका भरधाव ट्रकने शिवसैनिकांच्या गाडीला पाठिमागून धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले आहेत. शिंदे गटाच्या युवा सेनेचे हे पदाधिकारी असल्याची माहिती मिळत असून दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जात होते. (Sangali Accident News)

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दसरा सण आणि त्यात मुंबईमध्ये होणारे शिवसेनेचे दोन दसरा मेळावे यात मुंबईची कायदा सुव्यवस्था
अबाधित राहण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झाले आहेत. आज मुंबईत दसरा मेळाव्यासाठी 6 अतिरिक्त आयुक्त,
16 डीसीपी, 46 एसीपी, 2493 पोलीस निरीक्षक, 12,449 पोलीस शिपाईंसह 33 एसआरपीएफ क्यूआरटी आणि
होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Reservation | उद्या मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णयाची शक्यता कमीच, फडणवीसांचे संकेत; म्हणाले…

Pune Water Supply News | पुण्यातील काही भागाचा गुरुवारी पाणीपुरवठा बंद

MCA Joins Hands With Punit Balan Group | एमसीएचा महाराष्ट्रातील क्रिकेट विकासाला चालना देण्यासाठी पुनित बालन ग्रुपसोबत करार