सांगली : आरेवाडीत जुगार अड्ड्यावर छापा, ९ जणांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथील अटकाळे मळ्यात सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून नऊ जुगार्‍यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 48 हजार 920 रूपये रोख, जुगाराचे साहित्य, नऊ मोबाईल, आठ मोटारसायकल असा 5 लाख 68 हजार 120 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी दुपारी एलसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’034914043X’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d9bf6db2-b900-11e8-ad9a-690d5511a401′]

चंद्रकांत यशवंत खरातत (वय 32), हरिबा सुर्‍याप्पा कोळेकर (वय 25), दादासाहेब राजाराम सरगर (वय 40), दशरथ आनंदा कोळेकर (वय 34, सर्व रा. आरेवाडी), तानाजी भिमराव मोहिते (वय 32, रा. कोळा-सांगोला), वासुदेव पांडुरंग ओलेकर (वय 48, रा. उदनवाडी, सांगोला), संतोष ज्ञानदेव दुधाळ (वय 30, रा. अंकले), संतोष रंगराव रजपूत (वय 58, रा. आगळगाव), नामदेव शंकर देसाई (वय 29, रा. ढालगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना आरेवाडीतील अटकाळे मळ्यात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने छापा टाकून 9 जुगार्‍यांना तीन पानी जुगार खेळताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून 48 हजार 920 रूपये रोख, जुगाराचे साहित्य, नऊ मोबाईल, आठ मोटारसायकल असा 5 लाख 68 हजार 120 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[amazon_link asins=’B015SZ0LXC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e6e58510-b900-11e8-92bf-2d7a322ad1c1′]

निरीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, जितू जाधव, राहुल जाधव, संजय पाटील, राजू शिरोळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी