सांगली : वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने विद्यार्थ्याची बॅग मिळाली परत

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

वाहतूक पोलिसांनी सतर्कता दाखवत रिक्षात विसरलेली विद्यार्थ्याची बॅग परत मिळवून दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रिक्षाचालकाला शोधून विद्यार्थ्याची महत्वाची कागदपत्रे व इतर साहित्य असलेली बॅग त्याला परत देण्यात आली. पोलिसांच्या सतर्कतेमुळे बॅग परत मिळाल्याची भावना विद्यार्थी शुभम कवले याने व्यक्त केली.
[amazon_link asins=’B014PHNRE4′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f28dfce7-8e8b-11e8-b4e5-3d9757f7633a’]

शुभम मूळचा बारामतीचा आहे. तो येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत आहे. शनिवारी सकाळी तो विश्रामबागला जाण्यासाठी काँग्रेस भवनजवळ थांबला होता. तेथून तो रिक्षाने विश्रामबाग चौकात गेला. तेथे उतरल्यानंतर काही वेळाने त्याची बॅग रिक्षात विसरल्याचे लक्षात आले. तो तातडीने काँग्रेस भवनकडे गेला. नंतर त्याने वाहतूक शाखेचे पोलिस श्री. बारपटे यांना घडलेली घटना सांगितली. त्यांनी मुख्यालयातील सीसीटीव्ही विभागाशी संपर्क साधून श्री. मुलाणी यांना ही घटना सांगितली.

मुलाणी यांनी फुटेज पाहून ऱिक्षाचा क्रमांक शोधून काढला. त्यानंतर सोमवारी बारपटे विश्रामबाग चौकात कर्तव्य बजावत असताना त्यांना ती रिक्षा (एमएच 10 के 4413) दिसली. त्यांनी रिक्षाचालक मारूती बाबर याला सांगून बॅगेबाबत चौकशी केली. त्यानंतर बाबर याने ती बॅग असल्याचे बारपटे यांना सांगितले. नंतर ती बॅग घेऊन शुभमला परत करण्यात आली. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळेच महत्वाच्या कागदपत्रांची बॅग मिळाल्याचे शुभमने पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जाहिरीत