सांगली : अपहरणाच्या संशयावरुन मारहाण, ८ जणांविरुद्ध गुन्हा

सांगली  :  पोलीसनामा ऑनलाईन

नात्यातील मुलीला पळवून नेल्याच्या संशयावरून एकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली. शनिवारी (दि.१८) रात्री साडेसातच्या सुमारास कॉलेज कॉर्नर परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी आठजणांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये संतोष सिताराम कुंभार (वय 39, रा. हरिपूर) जखमी झाला आहे. विश्‍वजित महाडिक, रोहित (पूर्ण नाव नाही) यांच्यासह ६ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोष कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.
[amazon_link asins=’B077PT5Q4B’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c6212787-a3c0-11e8-a208-2d8fd9a8d9fb’]
कुंभार कुटुंबासमवेत हरिपूर येथे रहातात. ते सेल्समन म्हणून काम करतात. शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास ते कॉलेज कॉर्नर परिसरातून निघाले होते. त्यावेळी सर्व संशयित एका सुमोमधून त्यांच्याजवळ आले. त्यांना दमदाटी करत त्यांना गाडीत बसवण्यात आले. तेथून त्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले.

अज्ञात स्थळी नेल्यानंतर तुझा भाचा प्रभुदास कुंभार कोठे आहे तसेच आमची नातेवाईक मुलगी कोठे आहे अशी विचारणा करत त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांना शिवीगाळ करत पोलिसांत तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले. यामध्ये संतोष कुंभार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत त्यांनी रात्री उशीरा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.