Sangli Crime | सांगलीचा ‘पुष्पा’; चक्क पोलिस मुख्यालयातून चंदन चोरणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | सांगली पोलिस मुख्यालयाच्या (Sangli Police Headquarters) हद्दीतून चंदनाच्या झाडांची चोरी झाली (Sangli Crime) होती. पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम (SP Dixit Gedam) यांच्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरातून पुन्हा एकदा चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याने शहरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या चोरीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या (Local Crime Investigation Department) पथकाला यश आले आहे. पोलिसांनी चंदन चोरणाऱ्या दोघांना अटक (Arrest) केली आहे.

 

अभिमन्यू चंदनवाले (Abhimanyu Chandanwale) आणि रमेश चंदनवाले (Ramesh Chandanwale) अशी अटक केलेल्यांचे नावे आहेत. त्यांच्याकडून 3 किलो चंदन जप्त करण्यात आले आहे. दोघांनी रेकी करून पोलीस मुख्यालयातील चंदन चोरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, सांगली पोलीस मुख्यालयाच्या आवारात चंदनाची अनेक झाडे आहेत. शुक्रवारी रात्री चोरट्यांनी पाऊस सुरू असल्याची संधी साधत मुख्यालयातील ट्रॅफिक पार्कमध्ये प्रवेश करून चंदनाची झाडे कापली व त्याचा बुंधा चोरून नेला होता. याआधीही या भागातून चंदन चोरी झाली होती. या चोरीबाबात अधिक तपास करत असताना पोलिसांना खबऱ्यामार्फत वानलेसवाडी परिसरात दोघेजण चंदन विक्री करण्यासाठी आल्याची खबर मिळाली. (Sangli Crime)

त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी दाखल होत अभिमन्यू आणि रमेश चंदनवाले या दोघांना ताब्यात घेतले आहे.
एका संशयिताकडील पिशवीत 3 किलो 18 ग्रॅम चंदन आढळले आहे. यासंदर्भात विचारले असता संशयितांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी खाकीचा धाक दाखवताच त्यांनी मुख्यालयातून चंदन चोरी केल्याचे कबूल केले आहे.
त्यानंतर दोघांना अधिक तपासासाठी विश्रामबाग पोलिसांच्या (Vishram Bagh Police) ताब्यात देण्यात आले आहे.

 

Web Title :- Sangli Crime | chandan theft of sandalwood trees sangli police headquarters two arrested from miraj crime news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा