Sangli Crime | सांगलीत भाजप नगरसेवकाची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या, परिसरात प्रचंड खळबळ

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | सांगलीत नगरसेवकाच्या हत्येमुळे (BJP Corporator Murder) एकच खळबळ उडाली आहे. जतमध्ये भाजप नगरसेवक विजय ताड (Vijay Tad) यांची गोळ्या झाडून (Firing) हत्या करण्यात आली आहे. विजय ताड यांची इनोव्हा गाडी अडवून अज्ञात व्यक्तीने कारवर हल्ला चढवला. ताड यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू (Death) झाला. हा प्रकार (Sangli Crime) जत तालुक्यातील सांगोला रोडवरील अल्फोंसा स्कूल (Alphonsa School) जवळ भरदिवसा घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, जत नगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक विजय ताड यांच्यावर अल्फोंसा स्कूल समोर भर दुपारी पाळत ठेवून अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. ताड हे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेले होते. या घटनेमुळे तालुका हादरुन गेला आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणांनी झाली याबाबत मात्र शहरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. (Sangli Crime)
या घटनेची माहिती मिळताच जत पोलिसांचा (Jat Police Station) मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
ताड यांच्या हत्येचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे ताड यांच्या समर्थकांनी घटनास्थळी मोठी गर्दी
केली आहे. तर घटनेचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली (SP Basavaraj Teli)
हे देखील जतच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.
Web Title :- Sangli Crime | cinestyle firing in jat in sangli killing of corporators
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
ST Bus News | एसटीच्या भाड्यात महिलांना 50 टक्के सवलत, आजपासून नवे नियम लागू