Sangli Crime | शेजारील तरुणासोबत ‘चॅटिंग’ केल्याच्या संशयावरून ‘कुणाल’नं भावजय ‘सायली’ला संपवलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | शेजारील तरुणासोबत मोबाईलवर चॅटिंग केल्याच्या कारणावरून दिरानेच भावजयचा खून केल्याची घटना पलूस तालुक्यातील बुर्ली येथे उघडकीस आली आहे. सायली केतन पवार (वय २२) असे मृत महिलेचे नाव आहे तर कुणाल पवार (वय २८) याला पोलिसांनी अटक (Sangli Crime) केली आहे

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायली पवार ही शेजारी राहणाऱ्या तरुणासोबत चॅटिंग करत असते तसेच ती त्याला भेटलीही होती असा संशय दीर कुणाल याला होता.
गुरुवारी रात्री सायली ही बेडरुममध्ये एकटी होती.
त्यावेळी कुणालने बेडरूममध्ये जाऊन तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये सायली मृत्यू चा झाला.
दरम्यान, कुणालने घरातील जिन्यावरून सायली पडल्याचा बनाव केला.
मध्यरात्री तिला सांगलीतील एका खासगी दवाखान्यात दाखल केले.
डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिला मृत (Sangli Crime ) घोषित करण्यात आलं.

या दरम्यान त्याच रात्री म्हणजे गुरुवारी रात्री कुणालच्या घरा शेजारी राहणाऱ्या श्रेयस पवार या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली.
एकाच रात्री या दोन घटना घडल्याने पोलिसांनी या दोन्ही घटनांमधील संबंध शोधण्याचा प्रयत्न केला असता सायली पवारचा खून कुणालने केल्याचे शनिवारी उघडकीस आले.
पोलिसांनी कुणालला अटक केली असून न्यायालयात हजर केले असता त्याला दि २९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे देखील वाचा

Gold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश ! 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते 24 कॅरेट गोल्डचे नवीन दर

Pune Crime | लग्नाच्या 3 महिन्यानंतर देखील पत्नी ‘हात’ लावू देत नव्हती, पतीच्या हाती लागला मोबाईल अन् ‘लगट’ करतेवेळीचा ‘पर्दाफाश’

PM Mandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : sangli crime | murder case brother in law kunal pawar killed syali pawar after suspicion of chatting with neighborhood young boy in sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update