PM Maandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम

नवी दिल्ली : PM Maandhan Yojana | जर तुम्ही पीएम किसान सम्मान निधीचे लाभार्थी आहात तर ही बातमी तुमच्यासाठी खुप कामाची आहे. कारण सरकार अशा पात्र लोकांना आता मोठा फायदा देत आहे. सरकार या योजनेतील शेतकर्‍यांना 3000 रुपये महीना म्हणजे 36000 रुपये पेन्शन (PM Maandhan Yojana) देत आहे.

या योजनेचा फायदा अशा शेतकर्‍यांना मिळेल ज्यांचे वय 60 वर्षापेक्षा जासत आहे. केंद्र सरकारकडून पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजना चालवली जाते, ज्या अंतर्गत वार्षिक 6000 रुपये खात्यात येतात.

मोदी सरकारच्या (Modi Government) या योजनेचा लाभ त्या सर्व शेतकर्‍यांना मिळू शकतो, जे पीएम किसान सम्मान निधीचा लाभ घेत आहेत. तर, पीएम किसान सम्मान निधी योजनेतून सुमारे 11 कोटीपेक्षा जास्त शेतकर्‍यांना हप्ता मिळत आहे. पीएम किसानच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकार किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान मानधन योजनेचा (PM Maandhan Yojana) लाभ देत आहे.

– पेन्शनसाठी आवश्यक अटी

केंद्र सरकारकडून देशातील छोट्या आणि सीमांत शेतकर्‍यांसाठी प्रधानमंत्री मानधन योजना (PM maandhan yojana) पेन्शन योजना चालवली जात आहे. यामध्ये 60 व्या वर्षानंतर दरमहीना 3000 रुपयांची सुविधा दिली जाते.

Home Remedies of Stress Relief | स्ट्रेसमुळे प्रभावित होत असेल वैयक्तिक जीवन, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय उपयोगी ठरतील; जाणून घ्या

जर एखादा शेतकरी पीएम किसान सम्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) चा घेत असेल तर त्याला यासाठी कोणतेही कागदपत्र द्यावे लागणार नाहीत. या योजनेंतर्गत शेतकरी पीएम किसानमधून प्राप्त लाभातून थेट अंशदान करण्याचा पर्याय निवडू शकतो. अशाप्रकारे त्यास थेट आपल्या खिशातून पैसे द्यावे लागणार नाहीत.

कोण घेऊ शकतात या योजना फायदा

– 18 ते 40 वर्षापर्यंतचा कोणताही शेतकरी लाभ घेऊ शकतो.

– यासाठी तुमच्याकडे कमाल 2 हेक्टेरपर्यंत शेतीयोग्य जमीन असावी.

– किमान 20वर्ष आणि कमाल 40 वर्षापर्यंत 55 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत मासिक अंशदान करावे लागेल, शेतकर्‍याच्या वयावर अवलंबून आहे.

– जर 18 व्या वर्षी सहभाग घेतला तर मासिक अंशदान 55 रुपये असेल.

– जर 30 व्या वर्षी सहभाग घेतला तर 110 रुपये जमा करावे लागतील.

– तुम्ही जर 40 च्या वयात सहभागी झालात तर दरमहिना 200 रुपये जमा करावे लागतील.

हे देखील वाचा

LPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात सरकार करणार मोठा बदल? जाणून घ्या सबसिडीचा नवीन नियम

Earn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा?

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  PM Maandhan Yojana | 3000 rupees will come account every month after spending 55 rupees

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update