Sangli Crime News | सांगलीमध्ये तरुणाची गळा आवळून हत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – Sangli Crime News | सांगलीमध्ये आठ दिवसात खुनाची (Murder In Sangli) दुसरी घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री आष्टा – नागाव रस्त्यावर एका युवकाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. शिवाजी आप्पा कुलाळ (35 , मूळ गाव सोन्याळ, ता. जत, सध्या रा. आष्टा – नागाव रोड) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर नवनाथ विठ्ठल ऐवळे (वय 30) असे संशयित आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Sangli Crime News)

शिवाजी हा आष्टा नागाव रस्त्यावरील वन विभागाच्या जागेत झोपडपट्टीत राहत होता. त्याचा उसाचे वाडे विक्रीचा व्यवसाय होता. मृत शिवाजी हा मंगळवारी रात्री आपली मोटरसायकल घेऊन घराबाहेर पडला. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याच्या भावाने विलासने त्याला फोन करून घरी जेवायला बोलावले. यावेळी शिवाजीने पाच मिनिटातच घरी पोहोचतो असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्याचा फोन लागत नव्हता आणि रात्री तो घरीही आला नाही. यावेळी घरच्यांना वाटले की तो उसाच्या वाड्याच्या व्यवसायासाठी गेला असेल यासाठी ते वाट पाहत होते. (Sangli Crime News)

यानंतर बुधवारी सकाळी शिवाजीच्या भावाला म्हणजेच विलासला आष्टा पोलिसांनी फोन करून नागाव रस्त्या जवळील माळावर ओघळीत काटेरी झुडपाजवळ एक मृतदेह मिळाल्याची माहिती दिली.
यावेळी त्यांनी विलासला मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावले.
मृतदेह पाहताच हा शिवाजीचाच असल्याचे विलासने सांगितले.
शिवाजीचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याचबरोबर त्याच्या चेहरा,पाठ आणि कमरेजवळ
देखील जखमा होत्या. नवनाथनेच शिवाजीचा खून केल्याची फिर्याद विलासने आष्टा पोलीस ठाण्यात दिली आहे.

शिवाजीचे नवनाथ याच्या नातेवाईक महिला बरोबर संबंध असल्याच्या संशयावरून नवनाथ आणि त्याच्यात ८ दिवसांपूर्वीच कडडकीचे भांडण झाले होते.
यावेळी नवनाथने शिवाजीला “तू नाद सोड नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही” अशी धमकी देखील दिली होती.
त्यावेळी शिवाजीच्या भावानेच या दोघांचे भांडण सोडवले होते.

Web Title :  Sangli Crime News | Youth strangled to death in Sangli crime murder news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Khamgaon Jalna Railway Line Project | खामगाव-जालना रेल्वे प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार – मंत्री दादाजी भुसे

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | छत्रपती संभाजी महाराजांचा ‘स्वराज्यरक्षक’ असा उल्लेख केल्याबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले सरकारचे अभिनंदन

Maharashtra Politics | ’50 खोक्के आणि नागालँड ओक्के’वरुन विधानसभेत गोंधळ, मुख्यमंत्र्यांची सभागृहात डायलॉगबाजी

Ajit Pawar | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक