Sangli Crime | आईनेच घेतला 2 वर्षाच्या चिमुकलीचा जीव, सांगलीतील धक्कादायक घटना

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli Crime | सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका आईने आपल्या पोटच्या दोन वर्षाच्या चिमुकलीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवरून सांगली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्ञानदा संजय लोकरे (वय, 2 वर्ष) असं त्या मृत चिमुकलीचं नाव आहे. तर, रेवती संजय लोकरे, (वय, 26) असं आरोपी आईचं नाव आहे. या प्रकरणी सांगली संजयनगर पोलीस ठाण्यातील (Sanjaynagar Police Station) पोलसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी आईला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानदा जन्मतःच गतीमंद आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचा राग संशयित आई रेवती संजय लोकरे (Revati Sanjay Lokare) यांना होता. त्यातूनच तिने चिमुकली ज्ञानदाचा (Dnyanada) एका हाताने गळा आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून निर्दयीपणे हत्या केली आहे. याप्रकरणी पुढील संजयनगर पोलीस करीत आहेत.

Web Title :- Sangli Crime | The mother took the life of 2 year old Chimukali, a shocking incident in Sangli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Crime News | महिलेने पोलिसाशी घातली हुज्जत, उद्दामपणा दाखवत म्हणाली – ‘शुद्धीत रहा, नाही तर वर्दी उतरवून टाकेन’ (Video)

Pornography | लग्नानंतर स्त्रियांना पॉर्न पाहण्यात अधिक रस; अभ्यासातून माहिती समोर

Viral Video | बारामती : गोळीबार अन् ‘मोक्का’मधून जामिनावर सुटलेल्या माजी सरपंच जयदीप तावरेंना ‘दुग्धभिषेक’ (व्हिडिओ)