सांगलीतील भाजपाचे 9 नगरसेवक ‘नॉट रिचेबल’, राष्ट्रवादीनं नाराजांना ‘हेरलं’ ?

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन – सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमध्ये सध्या महापौर, उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपमध्येच चुरस पहायला मिळत आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून महापौर पदासाठी धीजर सूर्यवंशी तर उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम यांच्या नावावर शिक्कमोर्तब केेलेे. त्यामुळे इच्छुकांच्या दबावतंत्राचा काहीच उपयोग भाजप नेतृत्त्वार झाला नसल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, याच संधीचा फायदा घेत राष्ट्रवादीने भाजपच्या नाराज नगसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरु केले असून सध्या १३ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. त्यानुसार चार नगसेवक अज्ञात स्थळी असून अन्य चार जणांबरोबर चर्चा सुरु आहे.

मंगळवारी (दि. २३) महापौर, उपमहापौर पदांची निवडणूक ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महापौरपदासाठी भाजपाचे धीरज सूर्यवंशी, काँग्रेसकडून उत्तम साखळकर, तर राष्ट्रवादीतून मैनुद्दीन बागवान व दिग्विजय सूर्यवंशी या चारजणांनी अर्ज दाखल केले, तर उपमहापौरपदासाठी भाजपच्या गजानन मगदूम यांच्यासह काँग्रेसकडून उमेश पाटील, तर राष्ट्रवादीकडून सविता मोहिते व स्वाती पारधी यांचे अर्ज दाखल झाले.

महापौर, उपमहापौरपदावरून भाजपात गटबाजी सुरु झाली होती. त्यामुळे या निवडणूकीला रंगत आली. भाजप नेतृत्त्वाकडून रुसवे फुगवे काढण्याचे काम सुरु असताना ९ नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे भाजपमध्ये फूड पडल्याचे दिसून आले. पक्षाच्या बैठकीला केवळ ३० ते ३२ नगरसेवक उपस्थित होते. पाठ फिरवलेल्या नगसेवकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वजण नॉटरिचेबल होते. दरम्यान, रात्री उशिरा शहराबाहेर जाणाऱ्या तीन नगरसेवकांना रोखण्यात भाजप यश आलं, त्यानंतर ३० नगरसेवकांना गोवा सहलीवर भाजपने पाठवल आहे.

भाजपाने महापौरपदासाठी धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौरपदासाठी गजानन मगदूम नावं निश्चित केल्यानंतर अनेक नगरसेवक नाराज झाले. ही गोष्ट समजताच राष्ट्रवादीचे नेते अँक्शन मोडमध्ये येत भाजपाच्या नाराज नगरसेवकांशी संपर्क साधला. या नगरसेवकांना गळाला लावण्याचे काम सुरू भाजपाचे १३ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आले होते, त्यातील चौघांना अज्ञातस्थळी हलवले तर आणखी ४ जणांशी चर्चा सुरू होती. एका नगरसेविकेच्या घरी तिघेजण अज्ञातस्थळी जाण्यासाठी जमले होते. मात्र, नगरसेविकेसोबतची बोलणी फिस्कटली अन् राष्ट्रवादीच्या रणनितीची माहिती भाजपला मिळाली. भाजप नेते खडबडून जागे झाले. महापौरपदाचे उमेदवार धीरज सूर्यवंशी आणि त्यांचे समर्थकांनी थेट नगरसेविकेचे घर गाठले, याचवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे समर्थकही त्यांच्या घरासमोर जमा झाले होते.

अडीच वर्षांत तीन महापौर, उपमहापौर
पुढील अडीच वर्षांत भाजपाने तीन महापौर व तीन उपमहापौर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना शहराध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर म्हणाले, ठरल्याप्रमाणे प्रत्येक महापौर-उपमहापौरांना दहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून सूर्यवंशी यांच्यानंतर निरंजन आवटी व शेवटच्या दहा महिन्यांत अजिंक्य पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. उपमहापौर पदाबाबत मात्र ज्या त्या वेळी निर्णय घेतले जातील तसेच गटनेते पदाबाबतही हाच निकष लावण्यात आला असून, आणखी दोघांना गटनेतेपदाची संधी दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.