Sangli News । रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत 87 रुग्णांचा मृत्यू; प्रमुख डॉक्टरला अटक, सांगलीतील धक्कादायक प्रकार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना उपचारादरम्यान 87 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सांगली (Sangli News) जिल्ह्यातील मिरजेच्या अ‍ॅपेक्स हॉस्पिटलच्या (Apex Hospital) प्रमुख डॉक्टराला अटक करण्यात आली आहे. महेश जाधव (Mahesh Jadhav) असं या डॉक्टराचे नाव आहे. महेश जाधव (Mahesh Jadhav) याच्यावर महात्मा गांधी पोलीस ठाण्यात (Mahatma Gandhi Chowki Police Station) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (87 patients died due to hospital negligence; Chief doctor arrested,)

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

कोरोनाच्या (corona) दुसऱ्या लाटेमधे उपचारासाठी मिरजेतील अ‍ॅपेक्स हॉस्पिटल कोविड सेंटरला (Apex Hospital Covid Center) परवानगी देण्यात आली होती.
परंतु, मागील महिन्यात या रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता.
तसेच अनेक रुग्णांकडून अधिक बिलं आकारली असल्याच्याही अनेक तक्रारी आल्या आहेत.
अशा वाढत्या तक्रारीवरून सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस (Nitin Kapdanis) यांनी हॉस्पिटलवर कारवाई केली होती.
त्यानंतर आता सांगली महापालिकेच्या Sangli Municipal Corporation आरोग्य विभागाकडून महात्मा गांधी चौकी पोलीस स्टेशनमध्ये (Mahatma Gandhi Chowki Police Station) तक्रार दाखल करण्यात आली.
रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर महेश जाधव (Mahesh Jadhav) यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलिसांकडून प्रमुख डॉक्टरला अटकही करण्यात आली आहे.

Railway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वेत अप्रेंटिसच्या 3378 पदांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

या दरम्यान, याठिकाणी कोणत्याही प्रकारचे व्हेंटिलेटरची आणि अद्यावत अशी सुविधा उपलब्ध नव्हती. परंतु तरीदेखील अनेक रुग्णांवर उपचार करण्यात आले. या शिवाय याठिकाणी दाखल होणाऱ्या रुग्णांवर शिकाऊ डॉक्टरांकडून उपचार केल्याचंही समोर आलं आहे. त्याचबरोबर रुग्णालय प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रातही अनेक त्रुटी आढळल्या आहेत. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मागील एका महिन्यांत 87 रुग्णांना आपला प्राण गमवावा लागला आहे. याप्रकरणी सर्व बाबी पोलीस तपासात निष्पन्न झाल्या आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : Sangli News 87 patients died due to hospital negligence Chief doctor arrested

हे देखील वाचा

Dog instructor | राज्यातील पहिल्या महिला डॉग इन्स्ट्रक्टर सुप्रिया किंद्रे यांचा सत्कार

PM Narendra Modi । पीएम मोदींनी बोलावली जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक, कलम 370 नंतर आता कोणता निर्णय ?