Sangli News | शिराळ्यातील फार्महाऊसवर सापडले तब्बल 19 जिवंत नाग; वन विभागाची कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – Sangli News| प्रसिद्ध असणारी सांगली (Sangli News) जिल्ह्यातील शिराळ्याची (Shirala ) नागपंचमी यंदा साध्या पद्धतीनेच करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे शिराळ्यात तब्बल 19 जिवंत नाग (19 snakes) एका फार्महाऊसवर सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. मोठ्या प्रमाणात नाग सापडल्यामुळे शिराळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मडकी आणि पोती पिशवीत बंदिस्त करून ठेवलेले 19 नाग जप्त करून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहेत. सदरची कारवाई शिराळ्याच्या वन विभागाने (Shirala Forest Department) केली आहे. दरम्यान, वन विभागाने संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत माहिती अशी की, अज्ञात फोनवरून फार्महाऊसमध्ये नाग बंदिस्त करून ठेवले असल्याची माहिती वन विभागाला (Shirala Forest Department) मिळाली होती. या नागांचे प्रदर्शन होणार असल्याची माहिती वनविभागाला समजली. याबाबत माहिती मिळताच शिराळा येथील वनक्षेत्रपाल, वनपाल वनरक्षक आणि सांगलीतील वनविभागाच्या पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली असता, दरम्यान तेथील काही लोक त्या ठिकाणाहून पळून गेले.

या दरम्यान, वन विभागाच्या पथकाने संबंधित फार्महाऊसवर जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी अधिकाऱ्यांना तब्बल 19 जिवंत नाग सापडले. हे सर्व नाग मडकी, पोती, पिशवीत ठेवल्याचे वन विभागाच्या पाहण्यात आले. दरम्यान, या नागाची वैद्यकीय तपासणी करण्यात आलीय. यांनतर त्यांना सायंकाळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. या प्रकरणी वन विभागाने (Shirala Forest Department) गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा

MLA Devendra Bhuyar | तहसीलदारांना शिवीगाळ करणार्‍या आमदारास 3 महिन्यांची शिक्षा, 15 हजारांचा दंड

Honey Trap Racket Pune | हनी ट्रॅपद्वारे व्यावसायिकाला लुटणारी टोळी अटकेत, कोंढवा पोलिसांकडून तरूणीसह 6 जणांना अटक

Gold Price Today | सोन्याच्या दरात घसरण तर चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Raviraj Taware Firing case | रविराज तावरे गोळीबार प्रकरणात पुन्हा माळेगावचे माजी सरपंच जयदीप तावरेंना अटक होणार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Sangli News | sangli forest department seized 19 nag snakes from farmhouse

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update