सांगलीत ऑल आऊट ऑपरेशन, 73 हजारांचा दंड वसूल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री जिल्हा पोलिस दलातर्फे ऑल आऊट ऑपेशन राबवण्यात आले. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 270 केसेस करून 73 हजार 400 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या आदेशानुसार बुधवारी रात्री दहा ते बाराच्या दरम्यान हे ऑपरेशन राबवण्यात आले.

जिल्ह्यातील विविध चौक, कॉर्नर, ब्रिज, बायपास रस्ते, जंक्शन अशा सुमारे 30 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी चोरीच्या उद्देशाने फिरणार्‍या दोघांवर कारवाई करण्यात आली. सार्वजनीक ठिकाणी दंगामस्ती करणार्‍या 25 जणांवर बीपी अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. निर्धारित वेळेहून अधिकवेळ व्यवसाय सुरू ठेवल्याने 11 हॉटेल, ढाबे, पानपट्ट्या यांच्यावरही कारवाई करण्यात आली. बेकायदा देशी दारू विक्री करणार्‍या 8 जणांना अटक करण्यात आली. अवैधपणे जुगार अड्ड्यांवर छापे टाकून दोन गुन्हे दाखल करण्यात आले. रेकॉर्डवरील 68 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.

जामीनपात्र, अजामीनपात्र वॉरंट बजावलेल्या 18 जणांना ताब्यात घेण्यात आले. फरारी 15 संशयितांचा शोध घेण्यात आला. दारू पिऊन वाहन चालवणार्‍या 25 जणांवर कारवाई करण्यात आली. या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये अधीक्षक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 150 अधिकारी, 234 पोलिस कर्मचारी, 117 होमगार्ड यांनी भाग घेतला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी