Sanjay Biyani Murder Case | नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात NIA ला मोठे यश, प्रमुख शूटरला नेपाळ बॉर्डरवरुन अटक

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या (Sanjay Biyani Murder Case) करण्यात आली होती. संजय बियाणी हत्याकांड प्रकरणी (Sanjay Biyani Murder Case) राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (National Investigation Agency) पथकाला मोठे यश आले आहे. या प्रकरणाती मुख्य शूटर दीपक रांगा (Deepak Ranga) याला एनआयएच्या (NIA) पथकाने नेपाळ बॉर्डरवरुन (Nepal Board) बुधवारी (दि.25) अटक केली आहे.

गेल्या वर्षी 5 एप्रिल 2022 रोजी संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामध्ये दीपक रांगा याने बियाणी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. रांगा हाच मुख्य शूटर असल्याची माहिती नांदेड पोलीस (Nanded Police) दलातील सूत्रांनी दिली. दीपक रांगा हा अनेक देशविघातक गुन्ह्यातील आरोपी आहे. कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा (Terrorist Harvinder Singh Rinda) याच्या सांगण्यावरुन खंडणीसाठी (Extortion) संजय बियाणी यांची हत्या केली होती.

संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात (Sanjay Biyani Murder Case) नांदेड पोलिसांच्या विशेष पथकाने
15 जणांना अटक (Arrest) केली आहे. तर एका अल्पवयीन शूटरला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police)
गुजरातमधून बेड्या ठोकल्या आहेत. आता दुसऱ्या शूटरला अटक करण्यात आली असून दीप रांगा याच्या
ओळख परेडसाठी नांदेड पोलिसांचे एक पथक पंजाबमध्ये दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संजय बियाणी हत्याकांडात कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ रींदा याचा सहभाग असल्याने,
आणि दोन शूटर दहशतवादी गुन्ह्यात सहभागी असल्याने या प्रकरणाचा तपास देखील एनआयएकडे
जाण्याची शक्यता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटी
(Special Investigation Team (SIT) करत आहे.

Web Title :- Sanjay Biyani Murder Case | main shooter in sanjay biyanis murder case deepak ranga has been arrested by nia

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pathaan | … आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?, ‘पठाण’ चित्रपटावरून मनसेचा हल्लाबोल

Maharashtra Politics | परभणीत शिंदे गट राष्ट्रवादीला सुरूंग लावण्याच्या तयारीत; राष्ट्रवादीचा मोठा नेता शिंदे गटाच्या वाटेवर?

Jitendra Awhad | शरद पवार यांच्यावरील ‘त्या’ विधानावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश आंबेडकर यांना सुनावले; म्हणाले…