अभिनेता संजूबाबाचं मराठी चित्रपटात ‘बाबा’ म्हणून पर्दापण !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार संजय दत्त लवकरच मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकणार आहे. ट्विटरच्या माध्यमातून संजू बाबाने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. संजय दत्तने एका सिनेमाची घोषणा केली आहे. तुम्हाला कदाचित वाटत असेल की संजू बाबा अभिनय करणार आहे. परंतु संजय दत्त मराठीत अभिनय नव्हे तर, सिनेमाची निर्मिती करणार आहे. बाबा असे या सिनेमाचे नाव आहे.

बाबा हा सिनेमा संजय दत्तने त्याचे वडिल सुनील दत्त यांना समर्पित केला आहे. बाबा हा सिनेमा एस. दत्त प्रॉडक्शन आणि बल्यू मस्टँग क्रिएशन्स निर्मित असणार आहेत. 2 ऑगस्ट रोजी बाबा हा सिनेमा रिलीज होणार आहे. संजयच्या चाहत्यांना या सिनेमाची प्रतिक्षा राहिल हे मात्र नक्की.

आपल्या ट्विटमध्ये संजय दत्त म्हणतो की, “बाबा हा माझा पहिला मराठी चित्रपट माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या माझ्या बाबांना समर्पित.” असे संजयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमध्ये संजयने मोशन पोस्टरदेखील लाँच केलं आहे. एक लहान मुलगा आपल्या वडिलांसोबत सायकलवर बसला आहे असे या पोस्टरमध्ये दिसत आहे.

या सिनेमात कोणकोणते कलाकार दिसणार आहेत हे मात्र अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या सिनेमाचे दिग्दर्शन राज आर. गुप्ता करणार आहेत. भावनेला भाषा नसते अशी सुंदर टॅगलाईनही या सिनेमाला दिली आहे. अक्षय कुमार, प्रियंका चोपडा यांनीदेखील मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. आता यात संजय दत्तचेही नाव सामील झाले आहे.

आरोग्यविषयक वृत्त
पावसाळ्यात अनेकांना होते कावीळ; करा ‘हे’ उपाय
मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?
केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत
वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

You might also like