Sanjay Rathod | शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आमदार एकमेकांच्या संपर्कात; माजी मंत्री संजय राठोड यांच्या वक्तव्याने खळबळ

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Rathod | शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची कसलीच कसर बाकी ठेवताना दिसत नाहीत. त्यातच शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी एक विधान केले आहे. त्याची चर्चा आता होऊ लागली आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे आमदार एकमेकांच्या संपर्कात आहोत. असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

राजकीय संबंध वेगळे असले तरी आमची जुनी मैत्री कायम आहे. आमच्यामध्ये मतभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत. आम्ही एकमेकांशी आजही चांगलं बोलत आहोत. एकमेकांच्या संपर्कात आहोत, असं संजय राठोड यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

 

तर, पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘आम्ही शिवसेनेत (Shivsena) खांद्याला खांदा लावून कामे केली आहेत.
बाळासाहेबांच्या विचाराशी प्रेरित होवून आम्ही काम करत होतो. आज तेही त्याच विचाराने काम करत आहेत.
आणि आम्ही देखील तसचं काम करत आहोत. अनेक वर्षे आम्ही सोबत काम केले आहे. तेवढे संबंध आमचे आहेत.
त्यामुळे आम्ही आजदेखील एकमेकांच्या संपर्कात आहोत. अशी माहिती यावेळी बोलताना संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी दिली.

दरम्यान, संजय राठोड हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री राहिलेले आहेत.
मात्र, पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide) प्रकरणामुळे त्यांना दि.२८ फेब्रुवारी २०२१ रोजी राजीनामा द्यावा लागला होता.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचा हात असल्याची टीका तत्कालीन विरोधकांकडून करण्यात आली होती.
त्यानंतर संजय राठोड यांनी राजीनामा दिला होता. तसेच या प्रकरणात निष्पक्ष चौकशी करण्यात यावी.
अशी मागणी देखील त्यांनी राजीनामा दिल्यानंतर केली होती.

 

Web Title :- Sanjay Rathod | shivsena thackeray and shinde group mla in contact says sanjay rathod

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tagenarine Chanderpaul’s century | तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉलने रचला इतिहास; पिता- पुत्रांनी ‘या’ यादीमध्ये मिळवले स्थान

Rohit Pawar | रोहित पवारांचा BJP ला टोला; म्हणाले – ‘ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देणे हा भाजपचा डाव…’

Aaditya Thackeray | आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर असतानाच ठाकरे गटाला मोठा धक्का; जवळपास ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी केला शिंदे गटात प्रवेश