महाराष्ट्र ‘गांडू’ ची अवलाद नाही ; संजय राऊत यांचा अमित शहा यांना इशारा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना पोकळ धमक्यांना आणि पावटयांच्या इशाऱ्यांना कधीच घाबरत नाही. शिवसेनेचे वाघाचे काळीज आहे. आता महाराष्ट्र गांडूची अवलाद नाही हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे. अफजल खान आणि औरंगजेबास आम्हीच पटकवले आहे याचा विसर एवढ्या लवकर पडला आहे का? अशा आशयाचे ट्विट करून संजय राऊत यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लातूर येथे केलेल्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते अमित शहा 

राज्यात युती झाली तर ठीक अन्यथा एक एकाला उचलून आपटू असा गर्भित इशारा अमित शहा यांनी शिवसेनेला दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा काल रविवारी लातूर दौऱ्यावर आले असता त्यांनी हे विधान केले आहे. प्रत्येक बूथ प्रमुखांनी निवडणूक कशी जिंकता येईल हे पहिले पाहिजे. निवडणुका जिंकण्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे असे अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. अमित शहा यांच्या बोलण्यावरून शिवसेनेला फक्त इशाराच नाही तर आगामी काळात आपला पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याचे सांगितले होते.

तर याच मेळाव्यास संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि ,शिवसेने सोबत युती करायची कि नाही याचा निर्णय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा घेतील. महाराष्ट्रात युती होणार कि नाही होणार याची काळजी कार्यकर्त्यांनी करू नये या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील परंतु आपणाला राज्यात ४० जागा निवडून आणायच्या आहेत आणि राज्यातील २ कोटी लोकांनी यासाठी आपल्याला मतदान करण्याची आवश्यकता आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

शिवसेनेच्या आक्रमकपणाला शोभणारे उत्तर काल शिवसेनेच्या वतीने देण्यात आले होते. अमित शहा यांच्या उन्मत्त वक्तव्यावरून त्यांचा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांची हिंदुत्वा वरील भूमिका भाजपच्या मनात सलू लागली आहे. भाजप आता आमच्या अंगावर आली तर तीला आम्ही शिंगावर घेऊ असे उत्तर शिवसेनेच्या वतीने देण्यात आले होते.  आता संजय राऊत यांनी दिलेले उत्तर हि शिवसेना आणि भाजप यांच्या युतीच्या चर्चेला अनुकूल असे नव्हतेच. तर आज शिवसेनेची पक्षांतर्गत बैठक पार पडणार आहे. या बैठकीत भाजप सोबत युती करायची कि नाही या संदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.