Sanjay Raut | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करणं संजय राऊतांना भोवलं, नाशिकमध्ये गुन्हा दाखल

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना नाव (Shivsena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिंदे गटाला (Shinde Group) देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) दिला. यानंतर उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray Group) आणि शिंदे गट यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत बदनामीकारक उल्लेख केल्याचा दावा योगेश शिवाजी बेलदार (Yogesh Shivaji Beldar) यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात (Panchavati Police Station) राऊतांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात मध्यरात्री गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

पंचवटी पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भादंवी कलम 500 प्रमाणे हा गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चाटूगिरी हा शब्द वापरला. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची बदनामी केल्याचा आरोप योगेश बेलदार यांनी केला आहे.

दरम्यान शिवसेना नाव आणि धनुष्यबाण उद्धव ठाकरे यांच्या ताब्यातून शिंदे गटाकडे गेलं आहे.
उद्धव ठाकरेंनी या निर्णयावरुन आयोगावर जोरदार टीका केली आहे.
तर संजय राऊत यांनी ट्विट करुन खळबळजनक आरोप केला आहे. माझी खात्रीची माहिती आहे.
चिन्ह आणि नाव मिळवण्यासाठी आतापर्यंत 2000 कोटींचा सौदा आणि व्यवहार झाले आहेत,
असा आरोप राऊतांनी केला आहे. तसेच हा प्राथमिक आकडा आहे आणि 100 टक्के सत्य आहे.
बऱ्याच गोष्टी लवकरच उघड होतील. देशाच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते, असा इशाराही राऊत यांनी दिला.

Web Title :- Sanjay Raut | criticism of chief minister case filed against sanjay raut in nashik

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ranbir Kapoor | रणबीर कपूरला पाहताच चाहतीने केले ‘हे’ कृत्य; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Politics | पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यावर विधीमंडळातील पक्ष कार्यालयही गेलं, शिंदे गटाने घेतला पक्ष कार्यालयाचा ताबा; ठाकरे गटाच्या आमदारांचे काय?