Sanjay Raut ED Action | राज्यपालांच्या वक्तव्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी ईडीची कारवाई ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut ED Action | शिवसेना नेते (Shivsena leader) खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी आज सकाळपासून ईडीने चौकशी (ED Inquiry) सुरू केली आहे. या चौकशीमुळे संतप्त शिवसैनिक राऊत यांच्या घराबाहेर ईडी आणि भाजपा (BJP) विरोधात घोषणाबाजी करत आहेत. पत्राचाळ प्रकरणी (Patrachal Case) ईडीकडून राऊत आणि त्यांच्या पत्नीची चौकशी सुरू आहे. ईडीने चौकशी सुरू केल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राज्यपालांच्या वक्तव्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी ईडीची कारवाई करण्यात आल्याचे काँग्रेस नेते (Congress leader) बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटले आहे.

 

पत्राचाळ प्रकरणी ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांना समन्स बजावली होते. पण, राऊत यांनी चौकशी टाळल्याने आज ईडीने त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी सुरू केली. राऊत यांच्या निवासस्थानी सकाळपासून ईडीचे अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, हे वृत्त समजताच मोठ्या संख्येने शिवसैनिक सुद्धा राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर जमा झाले असून ईडी (Sanjay Raut ED Action) आणि भाजपाविरोधी घोषणाबाजी सुरू आहे.

या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात मोठा गोंधळ उडाला आहे.
त्यांच्या या वक्तव्यावरुन लक्ष दुसरीकडे नेण्यासाठी राऊतांवर ही ईडीची कारवाई (Sanjay Raut ED Action) करण्यात येत आहे.
या कारवाईकडे मी कसा पाहतोय यापेक्षा महाराष्ट्रातील जनता कशी पाहते हे महत्वाचे आहे.
तपास यंत्रणेचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे, असे थोरात यांनी म्हटले.

 

आज सकाळी सात वाजताच्या सुमारास खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक पोहचले आहे.
सकाळपासून राऊत यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी शोधमोहिम आणि चौकशी करत आहेत,
अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
दरम्यान, राऊत यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा पहारा आहे. कोणालाही आत जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

 

Web Title : – Sanjay Raut ED Action | sanjay raut ed action ed action to divert attention from governors statement criticism of balasaheb thorat

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा