Sadabhau Khot On Ajit Pawar | शेतकर्‍यांच्या मालकीचे साखर कारखाने घशात घातले आणि महिन्याभराच्या सरकारला जाब विचारताय ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sadabhau Khot On Ajit Pawar | विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुरग्रस्त शेतकरी (Flood Affected Farmers) आणि नागरिकांची स्थिती झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विदर्भाचा दौरा सुरू केला आहे. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) टीकास्त्र सोडत, शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने मदत जाहीर करा, असा इशारा दिला. यानंतर माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे (Ryat Kranti Sanghatan) प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अजित पवारांवर ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे.

 

सदाभाऊ खोत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, शेतकर्‍यांच्या मालकीचे साखर कारखाने (Sugar Factory), दूध संघ (Milk Union), जिल्हा बँका (District Bank) तुम्ही लोकांनी घशात घातल्या आणि महिन्याभराच्या सरकारला तुम्ही जाब विचारताय ? 50 वर्षाची राजकीय कारकीर्द, 4 वेळा मुख्यमंत्री, 2 वेळा कृषीमंत्री आपले साहेब, तरी महाराष्ट्राचा शेतकरी आत्महत्या का करतो ? असा सवाल खोत यांनी अजित पवार यांना केला आहे. (Sadabhau Khot On Ajit Pawar)

 

दरम्यान, विदर्भ दौर्‍यावर असलेल्या अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला शेतकर्‍यांच्या आत्महत्यांना जबाबदार कोण, असा सवाल केला होता. पवार यांनी म्हटले की, सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 1 लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. घरांसह गोठ्यांची पडझड झाली असून जनावरांचीही हानी झाली आहे. शेती कामे ठप्प पडली आहेत. रोजगार हिरावल्याने अनेकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, दिवसांमागून दिवस लोटत असूनही पावसाचा जोर कायम आहे.
त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तातडीने मदत जाहीर करावी.
अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. (Sadabhau Khot)

 

अजित पवार यांचा विदर्भ दौरा सुरू असताना भाजपाच्या (BJP) काही नेत्यांनी टीका केली.
या टिकेला उत्तर देताना पवार यांनी म्हटले की, मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणार्‍यांना काय कळणार की शेतात काय अडचणी आहेत ? इथे फिल्डवर उतरूनच बघावे लागते.

 

अजित पवार यांनी म्हटले, विदर्भात अनेक ठिकाणी अजूनही पाऊस पडतोय.
हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. शेतकरी अडचणीत आहे.
अशावेळी शेतकर्‍यांना आणि पूरग्रस्तांना आधी मदत द्या.
अजित पवार यांनी वर्धा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या पाहणी दौर्‍यात नुकसानग्रस्त भागातील शेतकरी आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा केली.

 

Web Title : – Sadabhau Khot On Ajit Pawar | former maharashtra minister sadabhau khot slams ncp ajit pawar over farmers suicide statement

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा