Sanjay Raut | ‘…म्हणून आम्हाला नोटापेक्षा कमी मतदान झालं’ – संजय राऊत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sanjay Raut | गोवा राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला (Shivsena And NCP) भोपळाही फोडता आला नाही. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागलेला आहे. गोव्यात (Goa) पुन्हा भाजपची (BJP) सत्ता येणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. या पराभवामुळे भाजपनेही शिवसेनेवर टीका करायची संधी सोडली नाही. मात्र अशातच शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या पराभवावर बोलताना भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

 

नोटापेक्षा None of the above (NOTA) कमी मतं मिळाली हे खरंय कारण आमच्याकडे भाजप पक्षाने ज्या प्रकारच्या नोटा वापरल्या त्या कमी होत्या.
तरीही आम्ही उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आणि गोव्यात आमच्या पद्धतीने लढलो.
ही लढाई सुरूच राहील, कोणत्याही निवडणुकीत विजय आणि पराजय हा अंतिम नसतो ती सुरुवात असते,
असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पंजाबमधील (Punjab) निकालावरही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा ऐतिहासिक (Historical) आणि क्रांतिकारी (Revolutionary) विजय झाला आहे.
राजकारणात, लोकशाहीत ज्यांचा विजय होतो, त्यांचे अभिनंदन (Congratulations) करण्याची परंपरा (Tradition) आपल्या देशात आहे.
त्यामुळे ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या पक्षांनी विजय (Victory) मिळाला आहे, मी त्यांचे पक्षाच्यावतीने अभिनंदन करतो,
असं म्हणत राऊतांनी अभिनंदन केलं.

 

दरम्यान, भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पराभवावर बोलताना, मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी आहे.
यांच्यापेक्षा नोटाला जास्त मतदान झालं आहे. अशा शब्दात फडणवीसांनी टोला हाणला.

 

Web Title :- Sanjay Raut | goa election results it is true that we got less votes than nota because sanjay rauts reply to devendra fadnavis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा