मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन | राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेस बरोबरच विविध राज्यांतील इतर पक्षाचे नेते देखील या यात्रेत सहभागी होत आहेत. महाराष्ट्रात ही यात्रा आली असता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी या यात्रेत आपला सहभाग नोंदविला होता. (Sanjay Raut) दिल्लीत ही यात्रा आली असता शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदारांनी यात सहभाग घेतला. आता ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी ते भारत जोडो यात्रेत लवकरच सहभागी होणार असल्याचे जाहीर केले आहे.
भारत जोडो यात्रा काश्मीर आणि पंजाबमध्ये पोहचल्यानंतर मी(Sanjay Raut) सहभागी होईल. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राहुल गांधी हे श्रीनगरमध्ये जावून तिरंगा फडकवणार आहेत ही ऐतिहासिक गोष्ट आहे. हजारो तरूण, वृध्द महिला यात्रेत सहभागी झाले आहेत. आता मीही भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. अशी माहिती संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटर वरून दिली.
Will be joining the March of Love, Friendship & Unity with @RahulGandhi at the #BharatJodoYatra.
Shall walk for the Unity of Nation on 20th January from Jammu, – a place that Shivsena Supremo Balasaheb Thackeray had a special bonding with.
Jai Hind,
Jai Maharashtra! pic.twitter.com/slbKQ8I3MZ— Sanjay Raut (@rautsanjay61) January 12, 2023
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली होती तेव्हा संजय राऊत(Sanjay Raut) नेमकेच तुरूंगातून बाहेर आले होते. यादरम्यान, त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी होणे टाळले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्यसोबत शिवसेनेचे इतर पदाधिकारी यात्रेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रात ही यात्रा दाखल होताच राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. राज्यात याच मुद्याचा आधार घेत शिवसेना पक्षाला टार्गेट केले जात होते. त्यामुळे संजय राऊत यांनी त्यावेळी यात्रेत सहभागी होणे टाळले होते. पण आता ते थेट काश्मीर मध्ये म्हणजेच या यात्रेच्या समारोपाच्या ठिकाणी या यात्रेत सहभागी होणार आहेत.
२० जानेवारीपासून संजय राऊत(Sanjay Raut) हे जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होतील अशी
माहिती त्यांनी आपल्या ट्वीटरवरून दिली आहे.
तसेच त्यांनी राहूल गांधी यांना त्यांच्या टी शर्ट वरून हिनवणाऱ्यांचा देखील त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
कपड्यावरून कसले वाद करता? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
तसेच राहुल गांधी हे एखाद्या तपस्वीप्रमाणे काम करत आहेत अशी लोकांची भावना असल्याचेही त्यांनी म्हटले.
सत्ताधाऱ्यांनी धसका घ्यावा अशी ही भारत जोडो यात्रा आहे. राहुल यांचे नेतृत्व या यात्रेमुळे उजाळून निघाले आहे.
या यात्रेचा फायदा लोकशाहीला मजबूत करण्यासाठी होऊ शकतो. असेही संजय राऊत(Sanjay Raut) म्हणाले.
Web Title :-sanjay Raut | joining the bharat jodo yatra sanjay raut told the date and balasahebs connection
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update