Sanjay Raut | संजय राऊत कर्नाटक मंत्र्याच्या वक्तव्यावर भडकले; म्हणाले ‘मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करा ना…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन हे सध्या नागपूर येथे सुरू आहे. त्यात काल कर्नाटक विरोधात विधीमंडळात एकमताने ठराव मंजूर झाला. त्याचे पडसाद कर्नाटकच्या विधीमंडळात देखील पहायला मिळाले (Sanjay Raut). त्यादरम्यान कर्नाटकचे उच्च शिक्षणमंत्री सी. एन. अश्वय्या यांनी मुंबईच्या मुद्यावरून एक वादग्रस्त विधान केले. मुंबईत २० टक्के कानडी लोक असल्याचे म्हणत मुंबईला केंद्रशासित करा. असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राची खोड काढली. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्नाटकच्या मंत्र्यांना जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, ‘कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांनी म्हटलंय की मुंबईला केंद्रशासित प्रदेश करावं, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, काही मंत्र्यांनी म्हटलंय ना? मग मागणी करा ना, बघतो आम्ही. मुंबईत कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत. मुंबईत संपूर्ण देश सामावलेला आहे, फक्त कर्नाटक नाही. मुंबईत मराठी माणसाबरोबर उत्तरप्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात अशा सगळ्याच प्रातांची लोक आनंदाने नांदतात आणि आम्ही त्यांना सन्मानाने वागवतो. तसं सीमाभागात होतयं का? नाही. आधी सीमाभाग केंद्रशासित होईल, कारण तिकडे मराठी बांधवांवर मागील ७५ वर्षांपासून अत्याचार होत आहेत, म्हणून आम्ही ती मागणी करत आहोत. मूर्ख आहेत ते मंत्री.’ अशी टीका कर्नाटकच्या मंत्र्यांवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली.

नेमके काय म्हणाले होते कर्नाटकचे मंत्री?

जर बेळगावला केंद्रशासित करायचं असेल तर आम्हालाही मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करता येते.
महाजन आयोगाच्या मागण्या महाराष्ट्राने फेटाळल्या आहेत. त्यामुळे आता काहीच प्रश्न नाही.
सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राने दाखल केलेला खटला टिकणार नाही,
तसेच यासंबंधीचा प्रश्न सोडविण्याचा अधिकार संसदेकडे आहे. सीमाप्रश्न संपलेला आहे, याबाबत चर्चाही करू नये.
आम्ही शांतताप्रिय आहोत.
अशा शब्दात कर्नाटकचे शिक्षणमंत्री सी.एन.अश्वय्या यांनी महाराष्ट्राची कानउघडणी केली. (Sanjay Raut)

सीमाप्रश्नावर बोलताना शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान
जोपर्यंत सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत हा सर्व प्रदेश केंद्रशासित करा अशी मागणी
केली होती. तीच मागणी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी देखील केली होती.

Web Title :-  Sanjay Raut | maharashtra karnataka border dispute sanjay raut reply to the karnataka minister who said to centralize mumbai

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Rohit Pawar | अनिल देशमुखांची अटक ही त्यांना राजकीय दृष्टीकोनातून अडचणीत आणण्यासाठीचं; आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात…

Maharashtra Karnataka Border Dispute | मुंबईला केंद्रशासित करा म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मंत्र्याला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘मुंबई कोणाच्या बापाची…’