Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut on Kirit Somaiya | गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध रंगलं असल्याचे पाहायला मिळते. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्यावर जोरदार निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे.

 

संजय राऊत म्हणाले की, ”ज्या कंपन्यांवर ED, CBI ची चौकशी सुरू आहे, अशा कंपन्यांकडून किरीट सोमय्या देणग्या घेतात. युवक प्रतिष्ठानच्या खात्यात संशयास्पद देणग्या आहेत. मेट्रो डेअरीची ईडीची चौकशी सुरू आहे. याच कंपन्यांकडून सोमय्यांनाच कशी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या येतात ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, असे हे सोमय्या भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राची भाषा करतात. पण, जोपर्यंत भाजपामध्ये अशी माणसं आहेत, तोपर्यंत महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होणार नाही,” अशीही टीका त्यांनी केली.

 

दरम्यान, पुढे राऊत म्हणाले, ”युवक प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये पन्नास कंपन्या आणि 150 बिल्डरांकडून पैसे येताहेत.
भ्रष्टाचार संपवायला निघालेलाच सर्वात भ्रष्ट आहे.
लोकांना धमक्या देऊन सोमय्या पैसे घेत आहेत. ED आणि सीबीआयने सोमय्या यांना ताब्यात घेऊन तातडीने चौकशी करावी.
काही पैसे चेकने तर काही पैसे कॅशने येत आहेत. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत.
मी हवेत बोलत नाही,” असा दावाही त्यांनी केला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut on Kirit Somaiya | the most corrupt are those who set out to rid maharashtra of corruption shivsena mp sanjay rauts allegations against bjp leader kirit somaiya

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा