Sanjay Raut | संजय राऊतांची जहाल टीका, विधानसभा अध्यक्ष चोर आणि लफंग्यांचे सरदार की संविधानाचे रखवालदार, न्यायालयाने रोज त्यांना फासावर लटकवले पाहिजे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Sanjay Raut | राज्यात सध्या चोर आणि लफंग्यांचे सरकार आहे. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत की संविधानाचे रखवालदार म्हणून, हे त्यांनी स्पष्ट करावे, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राऊत यांनी थेट विधानसभा अध्यक्षांवर (Assembly Speaker) केलेल्या या जहाल टीकेनंतर मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

आमदार अपात्रता प्रकरणाचा (MLA Disqualification Case) निर्णय देण्यास विलंब होत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा अतिशय कठोर शब्दात फटकारल्यानंतर विरोधी पक्षांनी नार्वेकर यांना घेरले आहे.

याच संदर्भात टीका करताना राऊत (Sanjay Raut) म्हणाले, विधानसभा अध्यक्ष आणि त्यांच्या संरक्षणाखालील घटनाबाह्य सरकार हे संविधान विरोधी आहे. चोर आणि लफंग्यांचे सरकार ते चालवत आहेत आणि घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती त्यांना संरक्षण देत असेल तर या राज्यामध्ये काय चाललेलं आहे याची कल्पना न केलेली बरी आहे.

राऊत म्हणाले, नार्वेकर सांगत आहेत विधिमंडळाचे अधिकार सार्वभौम आहेत. याचा अर्थ असा नाही की चोरी करून एखाद्याच्या घरात शिरावे आणि त्या घराच्या मालकाने चोराला आणि खुन्याला संरक्षण द्यावे अशी या सार्वभौमत्वाची व्याख्या होत नाही

अतिशय जहाल टीका करताना संजय राऊत म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातून फासावर लटकवायचे आदेश आलेले आहेत.
सर्वोच्च न्यायालय शिक्षा सुनावते पण फासावर लटकवण्यासाठी जल्लादाची गरज असते ही जबाबदारी आता
विधानसभा अध्यक्षांवर आहे. या चाळीस आणि इतर आमदारांना घटनात्मक फासावर लटकवण्याची जबाबदारी
ही तुमच्यावर असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या.

राऊत म्हणाले, नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून काम करत आहेत की संविधानाचे रखवालदार म्हणून, हे त्यांनी स्पष्ट करावे.
चौकीदार चोर आहे, तसे संविधान पिठावर बसलेले चोर आहेत असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येऊ नये.
अगोदरच्या राजपाल आणि या विधानसभा अध्यक्षांनी इतक्या वेळा न्यायालयाचा अपमान केलाय की त्यांना
रोज न्यायालयाने फासावर लटकवले पाहिजे.

राऊत म्हणाले, शिवसेनेचे ४० आमदार मुख्यमंत्र्यांसह आणि राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अजित पवारांसह (Ajit Pawar)
हे लूट करून दुसऱ्या घरात शिरलेले आहेत. या दरोडेखोरांना विधानसभा अध्यक्ष सार्वभौमत्वाच्या नावाखाली संरक्षण
देत असतील तर मला वाटते राहुल नार्वेकर यांचे नाव देशाच्या काळ्या कुट्ट इतिहासात लिहिले जाईल.
विधानसभा अध्यक्ष उद्या खुर्चीवर नसतील तेव्हा अशा व्यक्तींना रस्त्यावर फिरणे मुश्किल होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political Crisis | शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाचे, सुनावणी पुन्हा लांबणीवर!