Sanjay Raut | संजय राऊतांचा थेट इशारा, म्हणाले – ‘… तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) आणि भाजपवर (BJP) अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं. जे प्रमुख लोक आहेत त्यांचा गळा दाबायचा, त्यांना अडकवायचं, त्यांच्या विरोधात खोटे पुरावे निर्माण करायचे, त्यांना बदनाम करायचं. पण ते भ्रमात आहेत. आमच्या सारखे लोक या दडपशाहीला जुमानणार नाही, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. त्याचवेळी त्यांनी भाजप नेत्यांना थेट इशारा दिला आहे.

 

आम्ही घरात घुसलो तर…
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या कुटुंबीयांनाही प्रचंड त्रास दिला जात आहे. रोज सकाळी एखादा माणूस उठतो आणि त्यांच्यावर कारवाई करतो. मी मागे सुद्धा बोललो होतो की, आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरलाही (Nagpur) जाता येणार नाही.

ट्रेलर यायचा आहे…
सध्या ईडी (ED) आणि इतर यंत्रणा या भाजपच्या किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटच्या (Criminal Syndicate) एक भाग बनल्या आहेत. आजचं हे लेटर आहे ना तो ट्रेलर नाही. आजचं पत्र हे मी केवळ माहितीसाठी लिहिलं आहे. हा ट्रेलर नसून ट्रेलर यायचा आहे. हे कशाप्रकारे ईडीचे लोकांचं काम सुरु आहे, यांचेच कशाप्रकारे आर्थिक घोटाळे आहेत, त्यांच्याकडून मनी लॉन्ड्रिंग (Money Laundering) सुरु आहे, हे ब्लॅकमेलिंग करतात, पैसे गोळा करतात, त्यांचे वसूली एजंट आहेत. लवकरच ईडीला बेनकाब करणार. हे ठाकरे सरकार, शरद पवार (Sharad Pawar) आणि त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत असल्याचे राऊत यांनी सांगितले.

 

आम्ही घाबरत नाहीत तुम्हाला
हे भाजपचे नेते वारंवार सांगत आहेत ना, की अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) बाजूच्या कोठीत तुम्हाला जावं लागेल.
ठीक आहे तुमची इच्छा असेल तर आम्ही जाऊ परंतु लक्षात घ्या आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालाही यावं लागेल.
कारण तुमची पाप जास्त आहेत, आम्ही शुद्ध आहोत. आम्ही घाबरत नाहीत तुम्हाला, असे राऊत यांनी सांगितलं.

 

Web Title :- Sanjay Raut | shiv sena leader and MP sanjay raut said if we enter in your house then you can not go nagpur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा