Sanjay Raut | ‘राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो पदयात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील हजेरी लावली आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil), अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) या यात्रेत सहभागी झाले होते. आता शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) देखील यात्रेत सहभागी झाले आहेत. त्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी या युवा नेत्यांकडे देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

 

‘भारत जोडो’ यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाल्यानंतर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांनी गळाभेट घेतली. या नंतर काही अंतर आदित्य ठाकरे राहुल गांधी यांच्यासोबत चालले. यावर बोलताना राऊत म्हणाले, देशात संविधान आणि लोकशाही चिरडली जात आहे. ती वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. (Sanjay Raut)

लोकशाही वाचविण्यासाठी दोन वेगळे पक्ष एकत्र आले, तर त्याच चुकीची काय आहे? तसेच आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. हे दोन तरुण नेते देशात उर्जा निर्माण करतील.
आदित्य ठाकरे या यात्रेत सहभागी झाल्यावर भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, दोन पप्पू एकमेकाला भेटत आहेत. त्यावर मी काय बोलू? तसेच चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी देखील उद्धव ठाकरेंवर शरद पवारांनी (Sharad Pawar)
जादूटोणा केला आहे, असे म्हंटले आहे. उद्धव ठाकरे पुरते शरद पवरांच्या जाळ्यात अडकले आहेत.
त्यामुळे उद्या त्यांनी सांगितले, तर ते काँग्रेसच्या देखील व्यासपीठावर जाऊन बसतील, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

 

Web Title :- Sanjay Raut | shiv sena sanjay raut reaction over aaditya thackeray
participated in congress rahul gandhi bharat jodo yatra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘उद्धव ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे’ – चंद्रशेखर बावनकुळे

Pune Crime | भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या पोस्टमनचा मृत्यू

SSC, HSC Exam 2023 | दहावी आणि बारावीला बाहेरून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचा मोठा दिलासा