Sanjay Raut | ‘महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार, पण…’ – संजय राऊत यांचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | राज्यातील राजकारण मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे यांच्याभोवती फिरत आहे. शिंदे गटाला 38 शिवसेना आमदार व 7 अपक्षांचा पाठिंबा आहे. दुसरीकडे, वर्षावर शिवसेनेने बोलवलेल्या बैठकीला 17 आमदार उपस्थित होते. सध्या महाराष्ट्रात राजकीय गोंधळ सुरु आहे. या घडामोेडीनंतर आता माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या विधानामुळे राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे.

 

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बोलताना महाविकास आघाडी सरकारबाबत (Mahavikas Aghadi Government) मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या या विधानामुळे राजकीय राजकारणात आणखी एक मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे. माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर 24 तासाच्या आता शिंदे गटातील आमदारांनी महाराष्ट्रात यावं, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी. यानंतर तुमच्या भूमिकेचा विचार होईल.” असं ते म्हणाले.

 

दरम्यान, याआधी संजय राऊत म्हणाले की, “आज आपल्यासमोर शिवसेनेचे दोन आमदार आहेत.
मराठवाड्यातले कैलास पाटील (Kailash Patil) आणि विदर्भातले नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आमच्याबरोबर आहेत.
यातले एकजण सूरतहून आलेत तर दुसरे गुवाहाटीवरुन आले आहेत.
इथे येताना त्यांना संघर्ष करावा लागला. ही संपूर्ण कहाणी थरारक आहे.
शिवसेनेच्या आमदारांना अपहरण आणि फसवून भाजपाने नेलं आहे. गुलाम बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे.”, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut appeal to shivsena rebel come in mumbai then we think walk out from mahavikas aghadi maharashtra political crisis

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा