Homeताज्या बातम्याSanjay Raut | '...तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल'

Sanjay Raut | ‘…तर मोदी सरकार कृषी कायदे पुन्हा आणेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Sanjay Raut | राज्यात महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकात अनेक कारणाने कुजबूज पाहायला मिळते. तसेच आघाडी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार (Modi government) यांच्यातही राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळते. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सध्या रुग्णालयात उपचार घेताहेत. तर आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा होताना दिसत आहे. यावरुन शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच त्यांनी शेतकरी कृषी कायद्याबाबतही भाष्य केलं आहे.

 

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकारला 2 वर्षे पूर्ण होत आहेत.
यानिमित्त उद्धव ठाकरे हेच 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहणार असे ठाम विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
तसेच, बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेखातर शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असल्याचं देखील ते म्हणाले.
एका मुलाखती दरम्यान बोलताना राऊत यांनी याबाबत वक्तव्य केलं आहे.

 

पुढं कृषी कायद्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कृषी कायदे परत आणू शकतात.
मोदी कधीही झुकत नाहीत. जनतेसमोर तर कधीच नाही. शेतकरी चिरडून मारले, लाठीमार झाला.
कधी कृषी कायदे मागे घेतले?, 13 राज्यातील पोटनिवडणुकीत पराभव झाला. इतर राज्यात नुकसान होईल या भीतीने निर्णय घेतला.
दुर्दैवाने युपीमध्ये सत्ता आली तर पुन्हा कायदे आणतील, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut criticized on modi government on farmers laws in interview

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Tata Group | टाटाची शानदार कामगिरी ! ‘या’ कंपनीकडून मिळतोय एका वर्षात 180 % परतावा; यात राकेश झुनझुनवालाचीही अधिक गुंतवणूक

Rakhi Sawant | काय सांगता ! होय, राखी सावंतची विराट कोहली अन् अनुष्का शर्माला कंडोम गिफ्ट करण्याची इच्छा; कारण जाणून व्हाल हैराण

Narayan Rane | ‘राज्यामधील महाविकास आघाडी सरकार कोसळणार अन्….’, नारायण राणेंनी जाहीर केली तारीख 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News